Tunisha Sharma Death Update Sheezan Khan To Appear In Court Today In Response He Said That Why I Broke Up With Tunisha

0
23


Tunisha Sharma Death Case : अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी अभिनेता शिझान खान (Sheezan Khan) चर्चेत आहे. तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप शिझान खानवर लावण्यात आला होता. आता या प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. शिझान खानला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. 

अभिनेता शिझान खानला आज दुपारी वसई न्यायालयात हजर केले जाणार आहे. वसई पोलीस त्याची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी करणार आहेत. पोलिसांनी शिझानचा फोन जप्त केला असून त्याच्या फोनमधील तुनिषासोबतचे चॅट आणि रेकॉर्डिंगचा तपास घेतला आहे. यात तपासात त्यांना काहीही आक्षेपार्ह आढळलेले नाही. अद्याप पोलिसांना तुनिषाचा फोन अनलॉक करता आलेला नाही. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रेकअपचा तुनिषाला खूप मोठा धक्का बसला होता. ती नैराश्यात गेल्याने तिच्या आयुष्यात एकटेपणा आला होता. आयुष्यात आलेला एकटेपणा असह्य झाल्याने तिने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. तुनिषाच्या आत्महत्येप्रकरणी आता तिच्या कुटुंबियांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. 

शिझान आपल्या जबाबात म्हणाला,”करिअरकडे लक्ष देण्यासाठी मी तुनिषासोबक ब्रेकअप केला होता”. याआधी दिलेल्या जबाबात शिझान म्हणाला होता,”मी आणि शिझान रिलेशनमध्ये होतो. पण इतर मुलींसोबत माझे संबंध होते हे खोटे आहे. आमचा धर्म वेगळा होता. आमच्या वयात खूप अंतर होतं त्यामुळे मी शिझानसोबत ब्रेकअप केला”. पोलीस चौकशीदरम्यान शिझानला रडू कोसळलं होतं. 

News Reels


तुनिषा आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत 17 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. शिझानला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आता हा कालावधी संपला असून आज पुन्हा त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तुनिषाची आत्महत्या नक्की कशामुळे झाली हे अद्याप समोर आलेले नाही. 

तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी पोलीस शिझान खानची सतत चौकशी करत आहेत. शिझान एकाचवेळी अनेक मुलांनी डेट करत असल्याची माहिती समोर आली होती. आता पोलिसांनी त्याच्या सीक्रेट गर्लफ्रेंडचादेखील शोध घेतला आहे. शिझान त्याचा जबाब सतत बदलत आहे त्यामुळे आता चौकशीदरम्यान पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

संबंधित बातम्या

Tunisha Sharma Death : “100 टक्के लव्ह जिहाद”; तुनिषाच्या काकांचा मोठा दावा

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here