Jharkhand Actress Riya Kumari: अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) निधनानं मनोरंजनसृष्टीमध्ये शोककळा पसरलीय आता आणखी एका अभिनेत्रीच्या मृत्यूनं अनेकांना धक्का बसला आहे. झारखंडमधील (Jharkhand) प्रसिद्ध अभिनेत्री रिया कुमारीची (Riya Kumari) गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. रिया कुमारी ही तिचा पती आणि मुलीसोबत प्रवास करत होती, तेव्हा ही घडली घटना. काही लोकांनी रियाची (Jharkhand Actress Riya Kumari) कार थांबवत त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रियावर लूटमार करणाऱ्यांनी गोळी झाडली, त्यात तिचा मृत्यू झाला.
रिया कुमारी (Riya Kumari) ही तिचा पती आणि मुलीसोबत प्रवास करत होती. रिया कुमारीचे पती प्रकाश कुमार हे कार चालवत होते. बुधवारी (28 डिसेंबर) सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास बागनान येथील महेश खेडा पुलाजवळ काही चोरांनी लुटमार करण्यासाठी रियाची गाडी थांबवली. रियानं लूटमार करणाऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्यावर गोळी झाडण्यात आली. घटनेनंतर आजूबाजूला कोणीही न दिसल्याने रियाचे पती प्रकाश कुमार यांनी गाडी चालवत पोलीस ठाणे गाठले. त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.
West Bengal | Riya Kumari ( also known as Isha Alya, a Jharkhand-based actor & Youtuber), was shot dead by snatchers in the Howrah district. The incident took place when she was travelling from Jharkhand to Kolkata. CCTV footage being examined: SP, Howrah Rural, Swati Bhangalia
— ANI (@ANI) December 28, 2022
News Reels
रिया कुमारीचा पती प्रकाश यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले जाईल, अशी माहिती हावडा ग्रामीण पोलीस अधीक्षक स्वाती भंगालिया यांनी दिली आहे. रिपोर्टनुसार, रिया कुमारीच्या कुटुंबीयांनी रियाचे पती प्रकाश यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
#UPDATE | West Bengal: Deceased Riya Kumari’s husband Prakash Singh has been arrested in an incident where she was shot dead. He’ll be produced in court: Howrah Rural Superintendent of Police Swati Bhangalia
— ANI (@ANI) December 29, 2022
जाणून घ्या यूट्यूबर आणि अभिनेत्री रिया कुमारीबद्दल
रिया कुमारीनं वयाच्या 22 व्या वर्षी झारखंड चित्रपटसृष्टीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. रियानं तिच्या नृत्यशैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. रिया ही युट्यूबर देखील होती. रिया तिच्या डान्सचे व्हिडीओ यूट्यूबरवर शेअर करत होती. ‘वह चलचित्र’ या मालिकेत रियानं प्रमुख भूमिका साकारली. या मालिकेमुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली. रियाचे पती प्रकाश कुमार यांनी एका चित्रराटचं दिग्दर्शन देखील केलं आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: