Russian Researchers Attempt To Re Awaken Ancient Viruses That Killed Giant Woolly Mammoths

  0
  23


  Russian Researchers Attempt to Re-awaken Ancient Viruses : रशियातील (Russia) शास्त्रज्ञ चार लाख वर्ष जुन्या विषाणूला जिंवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. चार लाख वर्षापूर्वी या विषाणूमुळे अनेक प्राणी मारले गेले असल्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. एका रिपोर्टनुसार, रशियामधील सायबेरिया शहरातील नोवोसिबिर्स्कमधील एका बायोवेपंस (Bioweapons) प्रयोगशाळेमध्ये यासंदर्भात संशोधन सुरु असल्याचा दावा करण्यात आला आहे. यानुसार, शास्त्रज्ञांच्या मते, या विषाणूमुळे हिमयुगामध्ये मॅमथ (Mammoth) म्हणजे मोठे जंगली सुळेदार हत्ती आणि प्राचीन गेंड्यांचा (Rhinos) मृत्यू झाला होता.

  4 लाख वर्ष जुन्या विषाणूला जिवंत करतोय रशिया

  द सन वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, रशियामधील याकुटिया भागामध्ये लाखो वर्षांपूर्वी मृत्यू झालेले मॅमथ आणि गेंड्याचे मृतदेह आढळले आहेत. या भागातील तापमान -55 डिग्री हूनमही कमी आहे. याच कारणामुळे चार लाख वर्षांपासून जमिनीखाली गाढलेल्या अवस्थेतही या मृत प्राण्याचे शरीर सुरक्षित राहिले आहे. शास्त्रत्रांना या प्राण्याचे मृतदेह आढळल्यावर त्यांनी संशोधन सुरु केले. यावेळी त्यांना मृत प्राण्यांच्या शरीरात अत्यंत धोकादायक विषाणू सापडला आहे. 

  सायबेरिया शहरात बायोवेपन्स लॅबमध्ये संशोधन सुरु

  रशियातील प्रयोगशाळेमध्ये या मृत विषाणूवर संशोधन सुरु असून हा विषाणू जिवंत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या धोकादायक विषाणू नोवोसिबिर्स्क या सायबेरिया शहरात बायोवेपन्स लॅबमध्ये संशोधन सुरु आहे. रशियातील ही लॅब ‘व्हेक्टर स्टेट रिसर्च सेंटर ऑफ व्हायरोलॉजी’ या नावानेही ओळखली जाते. या प्रयोगशाळेत वैज्ञानिक या चार लाख वर्ष जुन्या विषाणूला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा विषाणू हिमयुगातील मॅमथ आणि प्राचीन गेंड्यांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचे संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

  live reels News Reels

  ( रशियामध्ये संशोधन सुरु असलेल्या हिमयुगातील सापडलेल्या गेंड्याचा मृतदेह )

  याच धोकादायक विषाणूमुळे हिमयुगामध्ये महामारी पसरली

  शास्त्रज्ञांच्या मते, याच धोकादायक विषाणूमुळे हिमयुगामध्ये महामारी पसरली, ज्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला होता. या महामारीमध्ये शेकडो मोठे-मोठे प्राणी मारले गेले होते. यामुळे, या धोकादायक आणि संसर्गजन्य विषाणूबद्दल जाणून घेण्यासाठी या विषाणूला पुन्हा एकदा जिवंत केले जात असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.

  जगाला आणखी एका महामारीचा धोका

  रशियामुळे जगासमोर आणखी एका महामारीचा धोका निर्माण झाला आहे. सर्वसाधारणपणे, जेव्हा एखाद्या देशात अशा प्रकारचे संशोधन केले जाते तेव्हा यासंदर्भात जगभरातील शास्त्रज्ञांना माहिती दिली जाते. प्रत्येक देश इतर देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाची मदत घेऊन संशोधन करतो. पण युद्ध सुरू झाल्यापासून रशियन शास्त्रज्ञ जगातील इतर शास्त्रज्ञांच्या संपर्कात नाहीत. त्यामुळेच रशिया या विषाणूला आपल्या प्रयोगशाळेत बायोवेपन्स म्हणून तयार करु शकतो, अशी भीती युरोपीय देशांनी व्यक्त केलीआहे.
  2022/12/29/fa7136db008a088096198ffd7f2069091672299445431322_original.jpg” width=”540″ height=”453″ />

  ( रशियन प्रयोगशाळेत सापडलेल्या हिमयुगातील या मॅमल म्हणजे मोठ्या सुळेदार हत्तीच्या मृतदेहावर संशोधन सुरु आहे. )

  बायोवेपन्स म्हणजे काय?

  • बायोवेपन्स (Bioweapons) म्हणजेच जैविक शस्त्रे (Biological Weapons).
  • जीवाणू, विषाणू, कीटक आणि बुरशी यांसारख्या जैविक किंवा संसर्गजन्य घटकांचा वापर युद्धामध्ये मानव, प्राणी किंवा वनस्पती यांना मारण्यासाठी किंवा हानी पोहोचवण्यासाठी केला जातो.
  • बायोवेपन्स हे असे शस्त्र आहे, ज्याचा वापर करुन स्फोट न करता त्यापेक्षाही जास्त नुकसान करता येऊ शकते. 
  • जागतिक आरोग्य संघटनेनुसार, बॅक्टेरिया, विषाणू आणि बुरशीचा वापर बायोवेपन्स म्हणजेच जैविक शस्त्रे म्हणून केला जातो. 
  • जैविक शस्त्रांचा वापर करुन कमी वेळात जास्त प्रभाव टाकून अधिक आणि गंभीर नुकसान करता येते.
  • 1397 मध्ये मंगोलियन सैन्याने पहिल्यांदा जैविक शस्त्रांचा वापर केला होता.

  शास्त्रज्ञांकडून धोक्याचा इशारा

  लंडनच्या किंग्ज कॉलेजमधील जैवसुरक्षा तज्ज्ञ (Bio Security Expert) फिलिपा लेंटझोस यांनी रशियाच्या या संशोधनाबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. लेंटझोस यांनी चिंता व्यक्त करताना सांगितले आहे की, हा विषाणू जिवंत झाला आणि चुकून प्रयोगशाळेच्या बाहेर पडलास अथवा लीक झाला तर, जगात आणखी एक साथीचा रोग पसरू शकतो. हे फार धोकादायक ठरेल. हे संशोधन म्हणजे आगीशी खेळण्यासारखे आहे.

  एकीकडे कोरोना हा विषाणू मानवनिर्मित असल्याचा दावा केला जात आहे. चीनने प्रयोगशाळेत कोरोनाविषाणू तयार केला आणि तो लीक होऊन जगभरात कोरोना महामारी पसरलीस, असा आरोप चीनवर वारंवार केला जात आहे. कोरोना महामारीतून अद्याप जग सावरू शकलेलं नाही आणि आता रशियाच्या या संशोधनाने जगाची चिंता वाढवली आहे.

  महत्त्वाच्या इतर बातम्या

  Covid 19 : ‘कोरोना विषाणू मानव निर्मित’, वुहानमधील शास्त्रज्ञाचा दावा; अमेरिकेचा संबंध काय?  Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here