Kangana Ranaut On Heeraben Modi Death Prime Minister Narendra Modi Mother Death Condolences From Kangana Ranaut

0
18


Kangana Ranaut Reaction On Heeraben Modi Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आई हिराबेन मोदी (Heeraben Modi) यांचे आज (30 डिसेंबर) सकाळी निधन झाले आहे. मंगळवारी त्यांना यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर विविध स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला जात आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांच्या निधनावर कंगना रनौतने सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. कंगनाने तिच्या इंस्टा स्टोरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा त्यांच्या आईसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे,”कठीण प्रसंगी देव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयम आणि शांती देवो, ओम शांती”. 

हिराबेन मोदी यांनी 100 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनानंतर विविध स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळताच मनोरंजनसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. हिराबेन मोदी यांच्यावर आजच अंत्यसंस्कार होणार आहेत.  

live reels News Reels

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांच्या निधनावर प्रतिक्रिया देत अनुपम खेर म्हणाले,”आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आई हिराबेन मोदी यांच्या निधनाच्या बातमीने खूप वाईट वाटत आहे. तुमच्या आयुष्यात त्यांची जागी कोणीही घेऊ शकणार नाही. पण तुम्ही भारतमातेचे पुत्र आहे. माझ्या आईसह देशातील प्रत्येक आईचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे”. ‘द कश्मीर फाइल्स फिल्म’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही हिराबेन यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. 

कंगना रनौतचे आगामी सिनेमे

कंगना रनौतचा ‘धाकड’ हा सिनेमा यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा फ्लॉप ठरला होता. पंगाक्वीन कंगनाचा ‘इमर्जन्सी’ (Emergency) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात कंगना इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरादेखील तिच सांभाळत आहे.


‘इमर्जन्सी’ सह कंगनाचा आगामी ‘तेजस’ (Tejas) सिनेमा पुढल्या वर्षात सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. तसेच ‘सीता’ आणि ‘इमली’ हे तिचे आगामी सिनेमे आहेत. लवकरच ती ‘नटी बिनोदिनी’ या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. 

संबंधित बातम्या

Heeraben Modi Passes Away : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन, वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here