Tunisha Sharma Death Case Why Did The Elder Daughter Grow Close To Tunisha When She Was In A Relationship Tunisha Mother Question To Sheezan Khan

0
39


Tunisha Sharma Death Case Update : अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. तिच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. अशातच आता तिच्या आईने पत्रकार परिषद घेत शिझानवर (Sheezan Khan) अनेक आरोप केले आहेत. मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी शिझानने तुनिषावर दबाव टाकला होता. तिच्याशी जवळीक वाढवली गेली आणि नंतर अचानक तिचा विश्वासघात करण्यात आला, असा आरोप तुनिषाच्या आईने केला आहे. 

शिझानबद्दल तुनिषाच्या आईचा तक्रारीचा पाढा

तुनिषाची आई म्हणाली,शिझानसोबतच्या ब्रेकअपनंतर तुनिषा तणावात गेली होती. शिझानचं सेटवर नशापाणी चालायचं यासंदर्भात तुनिषाने मला माहिती दिली होती. आधीच एका मुलीशी संबंध असताना शिझानानं तुनिषाशी जवळीक का वाढवली असा प्रश्न मला पडला आहे. तुनिषाच्या मृत्यूला शिझानचं जबाबदार आहे. 

तुनिषाची हत्या झाली असू शकते, आईकडून संशय व्यक्त 

तुनिषाची आई पुढे म्हणाली,”तुनिषावर बुरखा घालण्यासाठी दबाव होता. शिझानकडून तुनिषाचा मानसिक छळ होत होता. तुनिषाची हत्या झाली असू शकते असा संशय तुनिषाच्या आईने व्यक्त केला आहे. तुनिषा माझ्यावर अजिबात नाराज नव्हती. तिला कोणत्याच गोष्टीसाठी मी नकार दिला नाही”. 

पत्रकार परिषदेत तुनिषाची आई म्हणाली,”शिझानने धोका दिला असल्याचं तुनिषाने मला सांगितलं होतं. तसेच शिझानसोबत बोलण्याचा आग्रहदेखील तिने केला होता. तिच्या सांगण्यावरुन मी शिझानला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावर तो म्हणाला,”मी काहीही करू शकत नाही. तुम्हाला जे करायचं ते करा”. त्याच्यामुळे माझ्या मुलीने आयुष्य संपवलं आहे. त्याला मी अजिबात सोडणार नाही”.

live reels News Reels

तुनिषाची आई पुढे म्हणाली,”शिझानला तुनिषाला लग्नाची कबुली दिली होती. त्यामुळे त्याच्यासोबतच्या ब्रेकअपनंतर ती तणावात गेली. दुसऱ्या मुलींसोबत संबंध असताना तो तुनिषासोबत रिलेशनमध्ये का होता या प्रश्नाचं उत्तर मला शिझानकडून हवं आहे. त्याने तुनिषाचा खूप वापर केला आहे. तुनिषा खूप संवेदनशील होती”. 

आत्महत्येदिवशी तुनिषा आईला काय म्हणाली?

नेहमीप्रमाणे तुनिषा सकाळी सेटवर गेली होती. शूटिंगला जाताना तुनिषा तिच्या आईला म्हणाली,”शूटिंगमुळे मी तुला वेळ देऊ शकत नाही”. त्यानंतर आत्महत्येच्या थोडा वेळ आधी तुनिषाचा तिच्या आईला फोन आला होता. त्यावेळी ती म्हणाली,”मला दोन दिवसांची नाताळची सुट्टी आहे. ही दोन दिवसांची सुट्टी चंदीगडला घालवण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी तुनिषाच्या आईने तिला होकारदेखील दिला होता. 

संबंधित बातम्या

Tunisha Sharma Sheezan Khan : तुनिषा-शिझाननंतर ‘अली बाबा-दास्तान ए काबुल’ घेणार प्रेक्षकांचा निरोप? मालिकेच्या सेटवर भीतीदायक वातावरणSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here