Tunisha Sharma Sheezan Khan After Tunisha Sheezan Ali Baba Daastan E Kabul Serial Will Bid Farewell To The Audience Scary Atmosphere On The Sets Of The Serial

0
15


Ali Baba- Daastan E Kabul May Off Air : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) आत्महत्येमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ‘अली बाबा : दास्तान ए काबुल’ (Ali Baba : Daastan E Kabul) या मालिकेच्या सेटवर गळफास घेत तिने आयुष्य संपवलं. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप शिझान खानवर (Sheezan Khan) लावण्यात आला असून तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. 

‘अली बाबा : दास्तान – ए काबुल’ या मालिकेत तुनिषा शर्मा आणि शिझान खान मुख्य भूमिकेत होते. त्यांची दोघांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता अभिनेत्रीच्या आकस्मिक निधनाने मालिका मात्र अडचणीत सापडली आहे. तुनिषाच्या आत्महत्येनंतर या मालिकेचं शूटिंग पूर्णपणे थांबलं आहे. त्यामुळे आता ही मालिका बंद होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

अभिनेत्री तुनिषा शर्माने 24 डिसेंबर 2022 रोजी ‘अली बाबा दास्तान ए काबुल’ या मालिकेच्या सेटवर मेकअपरूममध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं. अभिनेत्रीच्या निधनानंतर शिझान खानवर तिला आत्महत्येस प्रवत्त केल्याचा आरोप लावण्यात आला होता. या आरोपामुळे शिझान सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. तुनिषाच्या निधनानंतर निर्मात्यांनी या मालिकेचं शूटिंग थांबवलं आहे. आता ही मालिका बंद होणार असल्याच्या चर्चांना उधान आलं आहे. अद्याप निर्मात्यांनी यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. 

‘अली बाबा : दास्तान – ए काबुल’ या मालिकेचा मुख्य अभिनेता पोलिसांच्या ताब्यात असल्याने अद्याप निर्मात्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. तुनिषाच्या आत्महत्येमुळे मालिकेच्या सेटवरील इतर कलाकारदेखील घाबरले आहेत. एकंदरीत मालिकेच्या सेटवर सध्या भीतीदायक वातावरण आहे. 

live reels News Reels


तुनिषाच्या आत्महत्येमुळे ‘अली बाबा : दास्तान – ए काबुल’ या मालिकेच्या निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे. त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मालिकेसंबंधित एका कलाकाराने ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे,’अली बाबा : दास्तान – ए काबुल’ ही मालिका पुन्हा कशी सुरू करायची यावर निर्माते विचार करत आहेत. पण या संपूर्ण प्रक्रियेला थोडा वेळ लागेल. 

‘अली बाबा : दास्तान – ए काबुल’ या मालिकेचं सोनी सब या चॅनलवर प्रसारण होत आहे. जूनमध्ये या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. 22 ऑगस्ट 2022 रोजी या मालिकेचा पहिला एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. टीआरपीच्या शर्यतीतदेखील या मालिकेने बाजी मारली आहे. त्यामुळे आता ही मालिका बंद होणार की नव्या कलाकारांसह निर्माते या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात करणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 

संबंधित बातम्या

Tunisha Sharma Death Update : शिझान खान आज न्यायालयात हजर होणार; जबाबात म्हणाला;”… म्हणून केला तुनिषासोबत ब्रेकअप”

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here