Bjp Leader Chitra Wagh Share Tweet On Urfi Javed

0
36


Urfi Javed: अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) ही तिच्या वेगवेगळ्या अतरंगी लूकमुळे चर्चेत असते. उर्फी ही  अतरंगी लूक करुन फोटोशूट करते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. अनेक लोक उर्फीला तिच्या या फॅशनमुळे ट्रोल करतात तर काही जण तिचं कौतुक देखील करतात. आता नुकतेच भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी एक ट्वीट शेअर करुन उर्फी जावेदवर निशाणा साधला आहे. उर्फीला बेड्या ठोका, अशी मागणी या ट्वीटच्या माध्यमातून चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे. 

चित्रा वाघ यांचे ट्वीट

‘शी…ऽऽऽऽ अरे..हे काय चाललयं मुंबईत. रस्त्यांवर सार्वजनिक ठीकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई, हिला रोखायला मुंबई पोलिसांकडे IPC/CRPC आहेत की नाही, तात्काळ बेड्या ठोका हीला
एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत तर ही बया अजून विकृती पसरवतीये.’ असं ट्वीट चित्र वाघ यांनी केलं आहे. चित्रा वाघ यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले. 

live reels News Reels

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

चित्रा वाघ यांच्या या ट्वीटला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘बरोबर ताई अशा मुलींना काही वाटता की, नाही आम्हाला बघायला पण लाज वाटत आहे. ही रस्त्यावर उभी आहे.’ तर दुसऱ्या युझरनं लिहिलं, ‘या बाईला रोखायला हव पण त्याचा पेक्षा फॅशन डिझायनर वर कठोर कारवाई करायची गरज आहे.’

कोण आहे उर्फी जावेद? 

अॅक्टिंग, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये उर्फी काम करते. दुर्गा, सात फेरों की हेराफेरी, बेपनाह, जीजी मां, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीट सीजन 2 आणि कसौटी जिंदगी की या प्रसिद्ध मालिकांमध्ये उर्फीनं काम केलं आहे. उर्फीच्या सोशल मीडियावरील पोस्टला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळते. तिचे वेगवेगळे लूक हे चर्चेत असतात. एका मुलाखतीमध्ये उर्फीनं सांगितलं की, ‘ऐ मेरे हमसफर, जीजी मां, मेरी दुर्गा, बेपनाह, चंद्र नंदिनी या शोमध्ये काम केलं आहे. 2015 मधील टेडी-मेडी फॅमिली या मालिकेमधून उर्फीनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Urfi Javed : कहर! प्लास्टिक, वायरनंतर आता ब्लेडपासून ड्रेस; उर्फीचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी लावला डोक्याला हात

 



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here