Chala Hawa Yeu Dya Fame Actor In Trouble A Complaint Was Filed With The Police Due To The Facebook Account Being Hacked

0
18


Ankur Wadhave : फेसबुक (Facebook) हॅक होण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांत मनोरंजनसृष्टी संबंधित अनेक कलाकारांचे फेसबुक अकाऊंट हॅक झालं आहे. अशातच आता ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) फेम अंकुर वाढवेचं (Ankur Wadhave) फेसबुक अकाऊंट हॅक झालं आहे.  

अभिनेता अंकुर वाढवेच्या अडचणीत वाढ झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. अकाऊंट हॅक झाल्याचं कळताच त्याने सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

अंकुरने सायबर पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीची प्रत सोशल मीडियावर शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत त्याने लिहिलं आहे,”मित्रांनो माझं फेसबुक काही दिवसांपासून हॅक झालं आहे. त्यावर जे पोस्ट होणाऱ्या गोष्टीशी माझा काहीही संबंध नाही. बऱ्याच मित्रांनी माझ्याशी संपर्क साधत चिंता व्यक्त केली आहे”. 


अंकुरने पुढे लिहिलं आहे,”त्यासंबंधी मी सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. काळजी नसावी… असेच पाठीशी उभे राहा..धन्यवाद. सतर्क राहा माझ्या या पेजवरून काहीही मेसेज आला तर दुर्लक्ष करा. नशिबाने अजून कोणाला तसे मेसेज आलेले नाहीत. ही माहिती माझ्या व तुमच्याही मित्रांपर्यंत पोहोचवा”. 

अंकुर वाढवेचे फेसबुक अकाऊंट 24 डिसेंबरला हॅक झाले आहे. तसेच त्याची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे फेसबुक अकाऊंट कोणी हॅक केलं हे अद्याप समोर आलेलं नाही. सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे. अंकुर सध्या ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

संबंधित बातम्या

‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकुर वाढवे विवाहबंधनात

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here