National Crush Rashmika Mandanna Success Story 

0
18


Rashmika Mandanna Success Story : अभिनेत्री रश्मिका मंधाना हिने खूप कमी कालावधील चित्रपटसृष्टीत आपले नाव कमावले आहे.  अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलेल्या रश्मिका आता राष्ट्रीय क्रश बनली आहे. रश्मिका मंधानाला नॅशनल क्रशचा टॅग का देण्यात आला आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? तर त्याची देखील अनेक कारणे आहेत. रश्मिकाने प्रचंड कष्टाच्या जोरावर हे यश मिळवले आहे. भारतासह जगभरात रश्मिकाचे लाखो चाहते आहेत. जाज आपण तिच्या यशाची कहाणी जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे तिला चित्रपट क्षेत्रातच यायचे नव्हते. परंतु, एक टर्निंग प्वाईंट मिळाला आणि तिचं सगळ आयुष्यच बदललं. 

Rashmika Mandanna Success Story :  शिक्षकांमुळे पहिला चित्रपट मिळाला

रश्मिकाला चित्रपटात नाही तर शैक्षणिक क्षेत्रात करियर करायचे होते. त्याचवेळी तिच्या एका शिक्षकाने फ्रेश फेससाठी तिचे नाव दिले. त्यानंतर नाविलाजाने रश्मिलाला स्पर्धेत सहभागी व्हावे लागले. याच्याच माध्यमातून तिने  शीर्षक स्वतःच्या नावावर ठेवले आणि आपला पहिला चित्रपट देखील साइन केला.

Rashmika Mandanna Success Story :  रश्मिकाला  चित्रपटात काम करायचे नव्हते 

पहिला चित्रपट मिळाल्यानंतरही रश्मिकाला या क्षेत्रात आपण मागे पडेल असे वाटले. रश्मिका एका सामान्य कुटुंबातील आहे. अशा परिस्थितीत आपण अभ्यासाला खूप महत्त्व द्यावे असे तिला वाटत असे. परंतु, थोडंस वेगळं काही तरी केले तर नवीन अनुभव मिळेल असे तिला वाटले आणि तिने पहिल्या चितत्रपटात काम केले. विशेष म्हणजे तिचा पहिलाच चित्रपट चांगलाच गाजला. 

Rashmika Mandanna Success Story :  पहिला चित्रपटच सुपरहिट ठरला

रश्मिकाचे आतापर्यंत अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. चित्रपटांच्या यशामुळे आणि टॅलेंटमुळे रश्मिकाने लोकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. एकदा रश्मिकाच्या नावाने नॅशनल क्रश हॅशटॅगसह ट्विटरवर ट्रेंड होत होता. यानंतर रश्मिकाने स्वतः तिच्या ट्विटरवरून याचा एक स्क्रीनशॉट शेअर केला होता. 

live reels News Reels

Rashmika Mandanna Success Story :  श्रीवल्लीतून प्रसिद्धीच्या झोतात 

‘पुष्पा’ चित्रपटापासून रश्मिकाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटानंतर अभिनेत्रीला बॉलिवूडमधूनही ऑफर येऊ लागल्या आहेत. रश्मिकाने पुष्पामुळे जगभरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. श्रीवल्ली बनून ती सर्वांच्या हृदयावर राज्य करते. फोर्ब्स इंडियाच्या 2021 च्या सोशल मीडियाच्या सर्वात प्रभावशाली अभिनेत्यांच्या यादीत रश्मिकाचे नाव समाविष्ट झाले आहे.   

महत्वाच्या बातम्या

Ram Gopal Varma : दिग्दर्शक राम गोपाल वर्मांनी ओलांडल्या सर्व मर्यादा? अभिनेत्रीसोबतचा व्हिडीओ स्वत:च शेअर केला Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here