Payal Rohatgi Talked About Tunisha Sharma Death Case

0
64


Tunisha Sharma: छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) निधनानं मनोरंजनसृष्टीला धक्का बसला. तुनिषानं 24 डिसेंबरला  ‘अलिबाबा दास्तान ए काबुल’  या  मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली. तुनिषाच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तिला श्रद्धांजली वाहिली. आता नुकतीच अभिनेत्री पायल रोहतगीनं (Payal Rohatgi) तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाली पायल? 
पायलनं सांगितलं, ‘ती फक्त 20 वर्षांची होती. 2018 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितलं होतं की, ती डिप्रेशनचा सामना करत आहे. मी मानसिकदृष्ट्या मजबूत नाहीये, असंही तिनं सांगितले होते. त्यामुळे तनुषाच्या कुटुंबातील मोठ्या व्यक्तींनी तिची अधिक काळजी घ्यायला हवी होती. ती घरात कमावणारी व्यक्ती होती. त्यामुळे तिला कामाचंही दडपण असू शकतं.’ पायलच्या या प्रतिक्रियेनं अनेकांचे लक्ष वेधले. 

कोण आहे पायल रोहतगी? 
हे बेबी, ढोल,36 चाइना टाउन,रक्त,प्लान,मिस्टर १००% या चित्रपटांमध्ये पायलनं काम केलं. बिग बॉस, फिअर फॅक्टर, नच बलिये या शोमध्ये पायलनं सहभाग घेतला. तसेच लॉकअप या शोमुळे पायल चर्चेत होती. 


तुनिषा शर्माने ‘भारत का वीर पुत्तर : महाराणा प्रताप’ , ‘इंटरनेट वाला लव’ , ‘अलीबाबा : दास्ताने ए कुबुल’  आणि ‘इश्क सुभान अल्लाह’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं.  अभिनेत्री तुनिषा शर्मा गेल्या काही दिवसांपासून शिझान खानसोबत रिलेशनमध्ये होती आणि आत्महत्येच्या 15 दिवसांपूर्वीच त्यांचा ब्रेकअप झाला, असं म्हटलं जात आहे शिझानने तुनिषासोबतचं नातं संपवल्याने ती डिप्रेशनमध्ये गेली होती. त्यामुळेच तिने आत्महत्येचा पर्याय निवडला, असं देखील म्हटलं जात आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Sheezan Khan : शिझान खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; वसई न्यायालयाचे आदेश

 

 

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here