Riya Kumari New Twist In Riya Kumari Murder Case The Police Suspect That The Husband Has Hatched A Conspiracy

0
16


Riya Kumari : झारखंड (Jharkhand) येथील लोकप्रिय अभिनेत्री रिया कुमारी (Riya Kumari) हत्येप्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. तिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीला ताब्यात घेतलं आहे. हत्येचा कट पतीनेच रचल्याचा पोलिसांना संशय आहे. 

पश्चिम बंगालयेथील हावडा येथे बुधवारी रिया कुमारीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आता या घटनेनंतर पोलिसांनी रियाचा पती प्रकाश कुमार (Prakash Kumar) याला अटक केली आहे. अभिनेत्रीच्या पतीला पोलीस गुरुवारी न्यायालयात हजर करणार आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिया कुमारीचा पती प्रकाश यानेच तिच्या हत्येचा कट रचला असल्याचा संशय पोलिसांना आहे. सध्या या प्रकरणी पोलीस प्रकाशची चौकशी करत आहेत. रियाच्या कुटुंबियांनी तिचा पती प्रकाश सिंह विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. 

रियाला मारहाण आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी कुटुंबियांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच प्रकाशने तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही कुटुंबियांनी केला आहे. त्यामुळे झारखंड येखील बागनानच्या पोलिसांनी रियाच्या पतीला ताब्यात घेतलं आहे. 

रिया कुमारी ही प्रकाशची दुसरी पत्नी होती. त्याने तिच्या अनेकदा धमक्या दिल्या होत्या. त्यामुळे आता रियाच्या मृतदेहाची फॉरेन्सिक चाचणी करण्यात येणार आहे. रियाचा पती प्रकाश कुमार हा सिने-दिग्दर्शनक आहे. तसेच त्याने काही जाहिरांतीदेखील निर्मिती केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

रिया कुमारी (Riya Kumari) आणि तिचा पती आणि मुलीसोबत प्रवास करत होती. दरम्यान तिचे पती प्रकाश कुमार हे कार चालवत होते. बुधवारी (28 डिसेंबर) सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास बागनान येथील महेश खेडा पुलाजवळ काही चोरांनी लुटमार करण्यासाठी रियाची गाडी थांबवली. रियानं लूटमार करणाऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा लूटमार करणाऱ्यांनी तिच्यावर गोळी झाडण्यात आली. घटनेनंतर आजूबाजूला कोणीही न दिसल्याने रियाचे पती प्रकाश कुमार यांनी गाडी चालवत पोलीस ठाणे गाठले. त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

 

संबंधित बातम्या

Riya Kumari: पती आणि मुलीसमोर अभिनेत्री रिया कुमारीची हत्या; लूटमार करणाऱ्यांनी झाडली गोळी

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here