The Legend Of Maula Jatta Pakistani Movie Will Be Released In India A Big Update Has Come Out

0
25


The Legend Of Maula Jatt Release In India : ‘ल लेजेंड ऑफ मौला जट्ट’ (The Legend Of Maula Jatta) हा पाकिस्तानी सिनेमा 30 डिसेंबरला भारतात प्रदर्शित होणार होता. पण आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. जगभरात धुमाकूळ घातलेल्या या सिनेमावर भारतात विरोध होत आहे. 

आयनॉक्सच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘ल लेजेंड ऑफ मौला जट्ट’ या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याची माहिती निर्मात्यांनी दिली आहे. अद्याप या सिनेमाची रिलीज डेट समोर आलेली नाही. हा सिनेमा भारतीय सिने-प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारा आहे. पण काही मंडळींनी या सिनेमाला विरोध केल्यामुळे सध्या हा सिनेमा भारतात प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

‘ल लेजेंड ऑफ मौला जट्ट’ हा सिनेमा भारतात प्रदर्शित होणार नसल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्वीट करत दिली आहे. त्यांनी ट्वीट केलं आहे,”राजसाहेबांचा डंका, पाकिस्तानी सिनेमाला दणका… मनसेने दिलेल्या इशाऱ्यानंतर ‘ल लेजेंड ऑफ मौला जट्ट’ या पाकिस्तानी सिनेमाचं प्रदर्शन आता पूर्णपणे रद्द करण्यात आलं आहे. केवळ राज्यातच नाही तर देशभरात कुठेही हा सिनेमा आता प्रदर्शित होणार नाही”. 

अमेय खोपकर यांनी दुसरं ट्वीट केलं आहे,”पुन्हा जर कुणाला पाकिस्तानी कलाकरांबद्दल प्रेमाचा उमाळा वगैरे आला तर त्यांच्यासाठी एवढा एक इशारा पुरेसा आहे. मनसे आंदोलनाच्या या विजयाबद्दल माझ्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन”. 

live reels News Reels

अमेय खोपकर यांनी याआधीदेखील ट्वीट करत या सिनेमाला विरोध दर्शवला होता. त्यांनी लिहिलं होतं,”पाकिस्तानी सिनेमाला विरोध आहे म्हणजे आहे. यापूर्वी हा सिनेमा 23 डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. तो पाकिस्तानी सिनेमा आता 30 डिसेंबरला येतोय. हा सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणजे नाही”. 

‘ल लेजेंड ऑफ मौला जट्ट’ हा सिनेमा जगभरात 13 ऑक्टोबरला जगभरात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात फवाद खान (Fawad Khan) आणि माहिरा खान (Mahira Khan) मुख्य भूमिकेत आहेत. 25 देशांत हा सिनेमा 500 स्क्रीनवर प्रदर्शित झाला. 

संबंधित बातम्या

Ameya Khopkar: अमेय खोपकर यांचा पाकिस्तानी चित्रपट प्रदर्शनाला विरोध; ट्वीट शेअर करत थिएटर मालकांना केलं आवाहन

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here