Urfi Javed Give Reply To Chitra Wagh Tweet Say So Sad To See Politicians Today

0
23


Urfi Javed: अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) ही तिच्या अतरंगी स्टाईलमुळे चर्चेत असते. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी एक ट्वीट शेअर करुन उर्फी जावेदवर निशाणा साधला. उर्फीला बेड्या ठोका, अशी मागणी या ट्वीटच्या माध्यमातून चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे केली. त्यानंतर आता चित्रा वाघ यांच्या या ट्वीटला उर्फीनं रिप्लाय दिला आहे. उर्फीच्या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले. 

चित्रा वाघ यांनी उर्फीचा एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओला चित्रा वाघ यांनी कॅप्शन दिलं,  ‘शी…ऽऽऽऽ अरे..हे काय चाललयं मुंबईत. रस्त्यांवर सार्वजनिक  ठिकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई, हिला रोखायला मुंबई पोलिसांकडे IPC/CRPC आहेत की नाही, तात्काळ बेड्या ठोका हिला. एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होत आहेत. तर ही बया अजून विकृती पसरवतीये.’  चित्रा वाघ यांच्या या ट्वीटला उर्फीनं रिप्लाय दिला आहे. 

उर्फीचा रिप्लाय: 

‘सध्याच्या राजकारण्यांना पाहून वाईट वाटते. लोकांच्या नजरेत येण्यासाठी हे मला टार्गेट करत आहेत. बलात्कारासाठी माझ्या कपड्यांना दोष देणे, हे सोयीचे आहे. नेहमीच पीडितेच्या कपड्यांना दोष दिला जातो. चर्चा करण्यासारखे इतर मुद्दे देखील आहेत. जसे की,  बेरोजगारी, लाखो बलात्कार प्रकरणे, खून, या प्रकरणांचे  काय?’ असा रिप्लाय उर्फीनं केला. 

live reels News Reels

दुसऱ्या ट्वीटमध्ये उर्फी म्हणाली, ‘तुमच्यासारखे राजकारणी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा बाजूला ठेवतात. तुम्हाला माझ्याबद्दल बोलून जनतेचं लक्ष वेगळ्या विषयाकडे वळवायचे आहे. ज्या महिलांना मदतीची गरज आहे त्यांच्यासाठी तुम्ही प्रत्यक्षात काही का करत नाही? महिलांचे शिक्षण, प्रलंबित असलेली बलात्काराची प्रकरणे, याकडे तुम्ही लक्ष का देत नाही?’ उर्फीच्या या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

अॅक्टिंग, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये उर्फी काम करते. दुर्गा, सात फेरों की हेराफेरी, बेपनाह, जीजी मां, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीट सीजन 2 आणि कसौटी जिंदगी की या प्रसिद्ध मालिकांमध्ये उर्फीनं काम केलं आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Urfi Javed: ‘हिला तात्काळ बेड्या ठोका’; उर्फी जावेदचा व्हिडीओ शेअर करत चित्रा वाघ यांनी केली मुंबई पोलिसांकडे मागणी

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here