We Want Good Relations With Neighbourly Relations Do Not Mean Excusing Rationalizing Terrorism Said India Foreign Minister S Jaishankar

    0
    31


    S. Jaishankar in Cyprus: आम्हाला चांगले शेजारी देश हवेत याचा अर्थ दहशतवादाच्या दबावाला बळी पडून वाटाघाटी कराव्यात असा होत नसल्याचे भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी म्हटले. सायप्रस (Cyprus) येथील भारतीय समुदायासोबत बोलताना त्यांनी पाकिस्तानचे नाव न घेता सूचक इशारा दिला. जयशंकर यांनी यावेळी चीनच्या आक्रमक विस्तारवादी भूमिकेवरही टीका केली. 

    एस. जयशंकर यांनी म्हटले की, काही मुद्यांवर कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. दहशतवादामुळे भारताते जेवढे नुकसान झाले आहे, तेवढे नुकसान इतर कोणत्याही देशाचे झाले नसल्याचे जयशंकर यांनी म्हटले. कोणत्याही परिस्थितीत दहशतवादाला भारत मान्यता देणार नसल्याचे त्यांनी म्हटले. 

    पाकिस्तानवर अप्रत्यक्ष टीका करताना त्यांनी म्हटले की, आपल्याला सर्व शेजारी देशांसोबत चांगले संबंध हवे आहेत. मात्र, दहशतवादाच्या मुद्यावर तडजोड करावी असा त्याचा अर्थ होत नाही. दहशतवादाला शस्त्र बनवून त्याचा धाक दाखवत भारताला वाटाघाटीच्या चर्चेसाठी बसवले जाऊ शकत नाही, असेही त्यांनी म्हटले. 

    चीनच्या मुद्यावर काय म्हटले?

    चीनसोबतच्या सीमा वादाबाबत बोलताना एस. जयशंकर यांनी म्हटले की, प्रत्यक्ष ताबा रेषेला एकतर्फी पद्धतीने बदलण्यास भारताचा विरोध आहे. त्यामुळे चीनसोबत भारताचे संबंध सामान्य नाहीत असेही त्यांनी म्हटले. तवांग सेक्टरमध्ये भारत-चीनच्या सैन्यात झालेल्या संघर्षाबाबत त्यांनी सांगितले की, आपल्या सीमेवर आव्हाने आहेत. कोरोना महासाथीच्या दरम्यान या आव्हानात अधिक वाढ झाली असल्याचे त्यांनी म्हटले. 

    News Reels

    जयशंकर यांचा सायप्रस दौरा

     भारत आणि सायप्रसमधील राजकीय संबंधाला 60 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे सायप्रस दौऱ्यावर आहेत. सायप्रस दौऱ्यात जयशंकर यांनी सायप्रसच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा केली. या दरम्यान, दोन्ही देशांमध्ये संरक्षण आणि लष्करी करारावर स्वाक्षरी करण्यात आली. 

    पाकिस्तानकडून भारताविरोधात प्रचाराची मोहीम 

    पाकिस्तानकडून भारताविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर अपप्रचाराची मोहीम सुरू आहे. मागील काही दिवसांपासून पाकिस्तान सरकारचे काही मंत्री पत्रकार परिषद घेत भारतविरोधी प्रचार करत आहेत. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावट भुट्टो यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. भारत सरकारची विचारसरणी ही हिटलरची विचारसरणी असल्याचे भुट्टो यांनी म्हटले. पाकिस्तानचे राज्यमंत्री हिना रब्बानी खार यांनी भारताविरोधात गरळ ओकताना म्हटले की, भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’ने मागील दोन वर्षात 1200 हून अधिक दहशतवादी हल्ले केले आहेत. दहशतवादाचा वापर भारताइतका कोणीच केला नसेल असा आरोपही रब्बानी यांनी केला. 



    Source link

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here