Actor Prasad Oak Share Special Post On Social Media

0
65


Prasad Oak: अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) हा वेगवेगळ्या चित्रपटांमधून आणि कार्यक्रमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. प्रसादसाठी 2022 हे वर्ष खूप खास होते. त्याच्या चंद्रमुखी (Chandramukhi) आणि धर्मवीर या चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. धर्मवीर (Dharmaveer) या चित्रपटातील प्रसादच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं तर चंद्रमुखी या चित्रपटाचं प्रसादनं दिग्दर्शन केलं. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. प्रसादनं नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यानं या पोस्टमध्ये  2022 या वर्षाचा उल्लेख “सोनेरी वर्ष” असा केला आहे. 

प्रसादची पोस्ट

प्रसादनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याचे 2022 मधील काही खास फोटो दिसत आहेत. प्रसादनं या पोस्टला कॅप्शन दिलं, ‘प्रिय 2022…तू मला भरभरून दिलंस…!!! मी तुला कधीही विसरू शकणार नाही…माझ्या आयुष्यात कायमच तू “सोनेरी वर्ष” म्हणून राहशील…!!! काळजी घे… आणि तुझ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद 2023 कडे अलगद पोहोचव आणि त्याला सांग माझ्यावरचं प्रेम आणि आशीर्वाद तुझ्यासारखं कायम ठेव म्हणावं…! प्रिय 2023, तुझं अत्यंत मनःपूर्वक स्वागत, सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण कर आणि सगळ्यांचं आरोग्य उत्तम ठेव रे मित्रा…!!!’


प्रसादच्या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी तसेच सेलिब्रिटींनी पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्री अमृता खानविलकरनं प्रसादच्या पोस्टला कमेंट केली, ‘मोर पावर टू अस’ तर अभिनेता आदिनाथ कोठारेनं देखील प्रसादच्या पोस्टला कमेंट केली आहे.अनेक नेटकऱ्यांनी प्रसादच्या या पोस्टला कमेंट करुन त्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

प्रसाद ओकच्या धर्मवीर चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन प्रविण तरडे केले. तर या चित्रपटाची निर्मिती मंगेश देसाईनं केली. या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here