Urfi Javed: अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) ही तिच्या अतरंगी स्टाईलमुळे चर्चेत असते. आता या स्टाईलमुळे उर्फी ही अडचणीत सापडेल का? असा प्रश्न आता अनेकांना पडत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी एक ट्वीट शेअर करुन उर्फी जावेदवर निशाणा साधला होता. ‘एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होत आहेत. तर ही बया अजून विकृती पसरवतीये.’ असं या ट्वीटमध्ये चित्रा वाघ यांनी लिहिलं. उर्फीला बेड्या ठोका, अशी मागणी या ट्वीटच्या माध्यमातून चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे केली. आता चित्रा वाघ यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. ‘उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करा’ अशी मागणी चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे केली.
चित्रा वाघ यांनी नुकतेच एक ट्वीट शेअर केले आहे. या ट्वीटमध्ये चित्रा वाघ यांनी लिहिलं, ‘मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स आणि किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी यासाठी मुंबईचे मा. मुंबई पोलीस आयुक्तांची तसेच सहआयुक्त कायदा आणि सुव्यवस्था यांची भेट घेतं मागणी केली.’
मुंबई च्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स व किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या #उर्फीजावेद वर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी यासाठी
मुंबईचे मा.@CPMumbaiPolice तसेच सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था यांची भेट घेतं मागणी केली @MumbaiPolice @BJP4Maharashtra @BJP4Mumbai pic.twitter.com/M3HHpvTyMB
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 1, 2023
News Reels
चित्रा वाघ यांनी केलं होतं ट्वीट
चित्रा वाघ यांनी उर्फीचा एक व्हिडीओ ट्विटरला शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, या व्हिडीओला चित्रा वाघ यांनी कॅप्शन दिलं, ‘शी…ऽऽऽऽ अरे..हे काय चाललयं मुंबईत. रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई, हिला रोखायला मुंबई पोलिसांकडे IPC/CRPC आहेत की नाही, तात्काळ बेड्या ठोका हिला. एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होत आहेत. तर ही बया अजून विकृती पसरवतीये.’ चित्रा वाघ यांच्या या ट्वीटला उर्फीनं रिप्लाय दिला आहे.’
शी…ऽऽऽऽ
अरे..हे काय चाललयं मुंबईत
रस्त्यांवर सार्वजनिक ठीकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई हिला रोखायला @MumbaiPolice कडे
IPC/CRPC आहेत की नाहीतात्काळ बेड्या ठोका हीला
एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत तर ही बया अजून विकृती पसरवतीये @CPMumbaiPolice pic.twitter.com/M1loh1Mhge
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 30, 2022
उर्फीनं दिला होता रिप्लाय:
उर्फीनं चित्रा वाघ यांच्या ट्वीटला रिप्लाय दिला. ‘सध्याच्या राजकारण्यांना पाहून वाईट वाटते. लोकांच्या नजरेत येण्यासाठी हे मला टार्गेट करत आहेत. बलात्कारासाठी माझ्या कपड्यांना दोष देणे, हे सोयीचे आहे. नेहमीच पीडितेच्या कपड्यांना दोष दिला जातो. चर्चा करण्यासारखे इतर मुद्दे देखील आहेत. जसे की, बेरोजगारी, लाखो बलात्कार प्रकरणे, खून, या प्रकरणांचे काय?’ असा रिप्लाय उर्फीनं दिला.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: