Drishyam 2 OTT Release : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) हा सिनेमा या वर्षातला ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला होता. बॉक्स ऑफिवर या सिनेमाने चांगलीच कमाई केली होती. आता हा सिनेमा प्रेक्षक ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात.
‘दृश्यम 2’ कुठे पाहू शकता?
सिनेमागृहात रेकॉर्डब्रेक कमाई करणारा ‘दृश्यम 2’ हा सिनेमा प्रेक्षक अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहू शकतात. अद्याप हा सिनेमा प्रेक्षकांना मोफत पाहता येणार नाही. सध्या हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना काही पैसे मोजावे लागणार आहेत.
कोरोनानंतर अनेक सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले. सिनेमागृहात प्रदर्शित झालेले अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडले. पण ‘दृश्यम 2’ हा सिनेमा वर्ष सरता सरता आपली जादू दाखवू शकला. हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. एकंदरीत वर्षाच्या शेवटी या सिनेमाने बॉक्स ऑफिसला सुगीचे दिवस दाखवले.
News Reels
‘दृश्यम 2’ या सिनेमाने अनेक बिग बजेट सिनेमांना मागे टाकले. या सिनेमात अजय देवगण, श्रिया सरन, अक्षय खन्ना आणि रजत कपूर मुख्य भूमिकेत होते. सर्वच कलाकारांनी या सिनेमात आपल्या भूमिका चोख पार पाडल्या आहेत. आता सिनेमागृहात धुमाकूळ घातलेला हा सिनेमा प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे.
‘दृश्यम 2’ हा सिनेमा 18 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. अवघ्या काही दिवसांत हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. थरार-नाट्य असणाऱ्या या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या