Hong Kong Model Murder Police Find Missing Skull Of Murdered Hong Kong Model In Pot Of Soup

    0
    17


    Hong Kong Model Abby Choi Murder : हाँगकाँगमध्ये (Hong Kong) एक धक्कादायक हत्याकांड उघडकीस आलं आहे. 28 वर्षीय सुप्रसिद्ध मॉडेल ॲबी चोई (Abby Choi) मंगळवारी (21 फेब्रुवारी) बेपत्ता झाली होता. ॲबी बेपत्ता झाल्यानंतर दोन दिवसांनी सूप पॉटमध्ये तिची कवटी आणि फ्रिजमध्ये मृतदेहाचे तुकडे सापडले आहेत. पोलिसांना तपासादरम्यान, ताई पो जिल्ह्यातील एका घरात ॲबीची कवटी आणि मृतदेहाचे तुकडे आढळल्याने मोठी खळबळ माजली आहे. मृतदेहाचे तुकडे पाहून पोलिसांनाही मोठा धक्का बसला आहे. पोलिसांना या घरात एक इलेक्ट्रिकल कटर आणि मांस कापण्यासाठी वापरली जाणारी मशीन आणि काही कपडेही सापडले आहेत. 

    सूप पॉटमध्ये सापडली बेपत्ता मॉडेलची कवटी

    बेपत्ता मॉडेल ॲबीच्या मृतदेहाचे काही अवशेष पोलिसांना सापडले असून इतर अवशेषांचा शोध सुरु आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांना ॲबीच्या मृतदेहाचे काही अवयव सापडले नव्हते. ॲबीचं डोकं, धड आणि हात गायब होते. त्यानंतर आता मृतदेहाचं डोकं पोलिसांना सूपच्या पॉटमध्ये सापडलं आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेले पोलीस अधीक्षक एलन चुंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, कवटीवर कोणतंही मांस शिल्लक नव्हतं. गाजर आणि मुळा यासोबत कवटी सूपच्या भांड्यात तरंगत होती. 

    21 फेब्रुवारीपासून ॲबी बेपत्ता

    28 वर्षीय मॉडेल ॲबी चोई हाँगकाँगची प्रसिद्ध मॉडेल होती. 21 फेब्रुवारी रोजी ती अचानक बेपत्ता झाली. यावेळी तिचा शोध घेण्यात आला आणि पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली. प्रकरण हाय प्रोफाईल असल्यामुळे याकडेही प्रसारमाध्यमांचंही लक्ष लागलं होतं. त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा वेगाने तपास करत होते. दरम्यान, तपासादरम्यान पोलिसांना ताई पो जिल्ह्यातील एका घराची माहिती मिळाली. बेपत्ता होण्याआधी ॲबी चोई या ठिकाणी दिसली होती. 

    धक्कादायक अवस्थेत सापडले मृतदेहाचे तुकडे

    पोलीस अधीक्षक चुंग यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितलं की, “ज्या अवस्थेत डोकं सापडले ते फार धक्कादायक आहे. ज्या पॉटमध्ये मॉडेलचे डोकं सापडलं ते सूपने भरलेलं होतं.” “भांड्यात जेलीच्या स्वरुपात भरपूर चरबी जमा झाली होती. त्यात मांसही होते,” असं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांना असा संशय आहे की, मॉडेल ॲबीवर कारमध्ये हल्ला करण्यात आला. त्यानंतर तिला बेशुद्ध अवस्थेत घरी नेण्यात आलं.” फॉरेन्सिक तपासणीत कवटीच्या मागील बाजूस एक छिद्र आढळलं असून हा प्राणघातक हल्ल्याचा पुरावा असू शकतो, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.

    फ्रिजमध्ये मृतदेहाचे तुकडे

    पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, ताई पोमधील घरामध्ये छापेमारी करत तपास केला. पोलिसांनी घराची झडती घेतली असता ॲबी चोई कुठेच आढळून आली नाही, मात्र घरात ठेवलेला फ्रिज उघडला असता फ्रिजमध्ये मानवी पाय आणि मृतदेहाचे तुकडे पाहून पोलिसांना धक्काच बसला. पोलिसांनी कापलेले पाय, मानवी मांस, इलेक्ट्रिक करवत, मांस कापण्याचं यंत्र आणि महिलेचे कपडे जप्त केले. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे ॲबीचे शीर पोलिसांना सापडलं नाही.

    सूपच्या भांड्यात तरंगत होतं ॲबीचं डोकं

    त्यानंतर पोलिसांनी त्या घराच्या फ्रिजमध्ये सापडलेले मानवी शरीराचे तुकडे आणि दोन्ही पाय तपासणीसाठी पाठवले. हे तुकडे ॲबी चोईच्या मृतदेहाचेच आहेत याची खात्री करण्यासाठी ते तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यानंतर, पोलीस मृतदेहाच्या इतर अवशेषांचा शोध घेत होते. यादरम्यान, मंगळवारी तपासावेळी पोलिसांना याच घरात लपवून ठेवलेली मोठी भांडी सापडली. यामध्ये एक सूप बनवण्यासाठी भांडं होतं. या सूपने भरलेल्या भांड्यामध्ये ॲबीचं डोकं तरंगत होतं.

    ‘या’ चौघांनी कट रचला

    हाँगकाँग पोलिसांनी या हत्येप्रकरणी चार जणांवर आरोप केले आहेत. चोईच्या हत्येचा आरोप असलेल्यांमध्ये तिचा पूर्वाश्रमीचा पती ॲलेक्स क्वांग, त्याचे वडील क्वांग काऊ आणि ॲलेक्सचा भाऊ अँथनी क्वांग यांचा समावेश होता. यासोबतच ॲलेक्सची आई म्हणजेच ॲबीची पूर्वाश्रमीची सासू जेनी ली वरही पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे. या सर्वांना पोलिसांनी अटक केली आहे.

    ॲबीच्या हत्येमागचं नेमकं कारण काय?

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “ॲबी चोईचा तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि त्याच्या कुटुंबाशी कोट्यवधीच्या संपत्तीबाबत वाद सुरु होता. ॲबीचा 100 दशलक्ष डॉलरच्या मालमत्तेवरुन आर्थिक वाद सुरु होता. हेचं तिच्या मृत्यूचं कारण ठरल्याचं सांगितलं जातं आहे.”

    महत्त्वाच्या इतर बातम्या :

    Nikki Yadav Murder Case : तीन वर्षापूर्वी निक्की यादव आणि साहिलचं लग्न, लिव्ह इन सांगून तपास भरकटवण्याचा प्रयत्न; साहिलच्या वडीलांसह पाच जणांना अटक



    Source link

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here