Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Billi Billi Song Out Salman Khan Pooja Hegde Movie Song

0
21


Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Billi Billi Song: बॉलिवूडमधील भाईजान अशी ओळख असणाऱ्या सलमान खानच्या (Salman Khan) आगमी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. त्याचा ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटातील नय्यो लगदा हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आलं. या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातील बिल्ली बिल्ली (Billi Billi) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. 

21 एप्रिल 2023 रोजी ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा एक अ‍ॅक्शन कॉमेडी चित्रपट असणार आहे. या चित्रपटामधील बिल्ली बिल्ली हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्यात सलमान खान आणि पूजा हेगडे यांच्यासोबतच शहनाज गिल, भूमिका चावला, साऊथ सुपरस्टार वेकेंटश दग्गुबाती, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल हे कलाकार देखील दिसत आहेत. 

सलमानने नुकताच बिल्ली बिल्ली या गाण्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओला त्याने कॅप्शन दिलं आहे की, “हे गाणं ऐकून तुमच्या चेहऱ्यावर स्माईल येईल आणि तुम्हाला पॉझिटिव्ह वाटले, अशी आशा आहे.” व्हिडीओमध्ये सलमानची हटके स्टाईल आणि पूजाचा ग्लॅमरस अंदाज दिसत आहे. 

पाहा व्हिडीओ


‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाची निर्मिती सलमान खानसह साजिद नाडियाडवालाने केली आहे. या चित्रपटात पूजा आणि सलमानची जोडी पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

सलमानचे आगामी चित्रपट

‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाबरोबरच सलमानचा ‘टायगर-3’ हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट अजून जाहीर करण्यात आलेली नाही. या चित्रपटामध्ये सलमानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. किक-2 तसेच नो एन्ट्रीच्या सिक्वेलमधून सलमान प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Salman Khan: कुणी म्हणतंय, ‘पीटी टीचर’ तर कुणी म्हणतंय, ‘मुर्गी वाली डान्स स्टेप’; ‘नय्यो लगदा’ गाण्यामुळे सलमान खान ट्रोल

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here