New Nostradamus Predicts Outbreak Of World War 3  due To Chine Taiwan War Us Russia Ukrain Conflict Marathi News

    0
    18


    New Nostradamus : लोक आजही नॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाण्यांच्या अर्थ लावण्याचा प्रयत्न करत आहेत. पण याचवेळी ‘न्यू नॉस्ट्राडेमस’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या क्रेग हॅमिल्टन पार्करने (Craig Hamilton-Parker) एक धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. क्रेगच्या अंदाजानुसार, 2023 या वर्षात जगाला तिसऱ्या महायुद्धाला (World War 3) सामोरं जावं लागणार आहे. एका विमान अपघाताचं निमित्त होईल आणि तिसरं महायुद्ध सुरू होईल असं तो म्हणतो. या युद्धात चीनचे अनेक तुकडे होतील असंही त्यानं म्हटलंय. क्रेग हॅमिल्टन याने ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूची अचूक भविष्यवाणी केली होती. त्यानंतरच क्रेगला नवीन नॉस्ट्राडेमस म्हटले जाऊ लागले.

    New Nostradamus predicts outbreak of World War 3: युक्रेन-रशिया नव्हे तर तैवानमुळे होणार तिसरं महायुद्ध 

    क्रेग हॅमिल्टन भविष्यातील तिसर्‍या महायुद्धासाठी रशिया आणि युक्रेनला दोष देत नाही तर चीन-तैवानला जबाबदार धरतो. तैवानमध्ये एका विमान अपघाताची घटना घडेल आणि त्यामुळे तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात होईल असा अंदाज त्याने वर्तवला आहे. दोन पाणबुड्यांची  किंवा दोन विमानांची टक्कर होईल आणि जगासमोर हे संटक उभं ठाकेल असं तो म्हणतो. या घटनेमुळे चीन आणि अमेरिकेमध्ये मोठा संघर्ष निर्माण होईल, असं त्याने डेली स्टारशी केलेल्या संवादात म्हटले आहे. 

    China-Taiwan War: तैवान आणि चीनमध्ये संघर्ष 

    चीन-तैवानचा संघर्ष या वर्षी अधिक गंभीर रुप धारण करणार असल्याचं क्रेग हॅमिल्टन म्हणतोय. एकतर पाणबुड्या एकमेकांवर आदळतील किंवा विमाने आदळतील, असे क्रेगने सांगितले. हा अपघात असेल किंवा कदाचित कोणीतरी ते घडवून आणेल. त्यानंतर सुरू झालेला संघर्ष हा काही वेळातच भीषण रुप धारण करेल. तैवान आणि चीनमध्ये दीर्घकाळापासून संघर्ष सुरू आहे. तैवान स्वतःला स्वतंत्र राष्ट्र म्हणवतो, तर चीन तो आपलाच भाग असल्याचा दावा केलाय. 

    युद्धाचा परिणाम काय होईल?

    चीनने तैवानवर दावा केला असला तरी अमेरिकेने तैवानच्या स्वातंत्र्याला पाठिंबा दिला आहे. चीन आणि तैवानवरुन सुरू झालेलं हे युद्ध एवढं मोठं होईल की त्यासमोर रशिया-युक्रेन युद्ध कुठेच नसेल. क्रेग हॅमिल्टन म्हणतोय की,  या युद्धात रशिया चीनची बाजू घेईल, ज्यामुळे गोष्टी आणखी धोकादायक होतील. प्रकरणे बिघडतील, ही माझी मुख्य चिंता आहे. 

    चीनचे अनेक तुकडे होतील

    या युद्धामध्ये चीनचे न भरुन येणारं नुकसान होईल, त्याला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागेल. चीनचे अनेक तुकडे होतील, सध्याच्या मोठ्या चीनचे रुपांतर अनेक लहान देशांमध्ये होईल असा अंदाज क्रेग हॅमिल्टन याने व्यक्त केला आहे. फ्रान्सचा जगप्रसिध्द भविष्यवेता नॅस्ट्रोडॅमसने 2023 साली मोठं युद्ध होणार असल्याचं त्याच्या भविष्यवाणीत सांगितलं आहे. नॉस्ट्रॅडॅमसने 1555 मध्ये त्याच्या भविष्यवाण्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, सात महिन्यांचं मोठं युद्ध होणार आणि त्यामध्ये कोट्यवधी लोक मृत्यूमुखी पडणार. 

    ही बातमी वाचा: 



    Source link

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here