Gautami Patil Viral Video Case Fir Registered Pune Police Investigation Underway

0
23


Gautami Patil Viral Video : आपल्या नृत्याने सर्वांना घायाळ करणारी नृत्यांगणा म्हणजे गौतमी पाटील (Gautami Patil). गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमात राडा होतच असतो. पण गेल्या काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान गौतमी कपडे बदलत असताना ते शूट करुन त्याचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. आता पोलिसांनी याप्रकरणाची दखल घेत गुन्हा नोंद केला आहे.

पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद 

गौतमी पाटीलचा फेक इन्स्टाग्राम आयडी तयार करुन त्यावर व्हिडीओ पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 24 फेब्रुवारीला कार्यक्रमादरम्यान अज्ञात व्यक्तीने गौतमी पाटीलचा अर्धनग्न व्हिडीओ शूट (Gautami Patil Viral Video) केला. त्यानंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर गौतमी पाटीलच्या अन्य सहकाऱ्यांचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी गौतमी पाटील सोबत डान्स करणाऱ्या एका मुलीने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 

मुलीच्या तक्ररीची दखल घेत विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. विमानतळ पोलिसांनी या प्रकरणी कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला आहे. गौतमीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे येथे तक्रार नोंदवण्यात आली असल्याचं वृत्त समोर आलं होतं. 

नेमकं प्रकरण काय? 

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे पुण्यात आयोजन केले होते. दरम्यान ती कपडे बदलत असतानाचा व्हिडीओ शूट करुन सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. गौतमीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने तिला बदनाम करण्यासाठी तिचा व्हिडीओ शूट केल्याची चर्चा आहे. व्हायरल व्हिडीओ प्रकरण सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे. या प्रकरणावर अनेक तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 

गौतमी पाटील एक स्त्री असून तिचा अशा प्रकारचा व्हिडीओ व्हायरल करणं चुकीचं आहे. महिला कलावंताचा असा व्हिडीओ शूट करुन तो व्हायरल करणं निंदनीय आहे. जिजाऊ, रमाबाई, सावित्रीबाईंच्या महाराष्ट्रात एका स्त्रीची हेटाळणी का केली जाते? असा सवाल लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे (Mangala Bansode) यांनी उपस्थित केला आहे. तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी देखील या व्हायरल व्हिडीओ प्रकरणाची दखल घेतली आहे. एकंदरीत या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी सर्वच क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 

संबंधित बातम्या

Mangala Bansode : कलावंताची हेटाळणी का? गौतमी पाटीलच्या व्हायरल व्हिडीओवर लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडेंचा सवालSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here