Two Men From Gujarat Try To Break Into Shah Rukh Khan Bungalow Mannat In Mumbai

0
8


Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) गेल्या काही दिवसांपासून ‘पठाण’ (Pathaan) सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. दरम्यान शाहरुखच्या ‘मन्नत’ (Mannat) बंगल्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुरुवारी (2 मार्च) रात्री दोन तरुणांनी या बंगल्याची भिंत तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आहे. 

‘मन्नत’ची भिंत तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भिंत तोडणारे तरुण गुजरातमधील असून त्यांना त्यांना मुंबई पोलिसांनी  ताब्यात घेतलं आहे. दोन्ही तरुणांचा मोबाईलही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे. वांद्रे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,19-20 वर्षे वयोगटातील दोन तरुणांना ड्युटीवर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बंगल्यात प्रवेश करताना पकडलं आहे. 

 

आरोपी शाहरुखचे जबरा फॅन, भेटण्यासाठी गुजरातहून मुंबईत

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही तरुण शाहरुखचे मोठे चाहते असून त्याला भेटण्यासाठी ते खास गुजरातहून आले आहेत. शाहरुखचा भेटण्याची त्यांची खूप इच्छा आहे. चौकशीदरम्यान तरुणांनी पोलिसांना ही माहिती दिली आहे. विनापरवाना खासगी मालमत्तेत प्रवेश केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत. 

विनापरवाना मन्नतमध्ये प्रवेश केल्याप्रकरणी दोन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आता पुढील तपास करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर दुसरीकडे एका सूत्राने ईटाइम्सला माहिती देत सांगितले, गुरुवारी रात्री ही घटना घडली तेव्हा शाहरुख खान त्याच्या आगामी ‘जवान’ या सिनेमाचं शूटिंग करत होता. तो मध्यरात्री आला तेव्हा ‘मन्नत’च्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आत लपून बसलेल्या दोन्ही तरुणांना पकडलं. 

गौरी खानवर गुन्हा दाखल

दुसरीकडे शाहरुखची पत्नी गौरी खानवर लखनौच्या एका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरी ही तुलसियानी कन्स्ट्रक्शन अॅन्ड डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीची ब्रॅंड अॅंबेसेडर असून तिच्या जाहिरातीने प्रभावित होऊन मुंबईत राहणाऱ्या किरीट शहा या व्यक्तीने लखनौत 86 लाखांचा एक फ्लॅट विकत घेतला होता. पण पूर्ण पैसे दिल्यानंतरही त्यांना फ्लॅट मिळाला नसल्याने त्यांनी गौरी खानवर फसवणुकीचा आरोप केला आहे. अद्याप याप्रकरणी गौरी खानने प्रतिक्रिया दिलेली नाही. 

संबंधित बातम्या

Gauri Khan : शाहरुखची पत्नी गौरी खानवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here