Anushka Sharma Virat Kohli Visit Mahakaleshwar Temple In Ujjain Video Viral

0
9


Virat Kohli And Anushka Sharma At Mahakal Temple : भारतीय क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्माने (Anushka Sharma) नुकतचं उज्जैनमधील (Ujjain) प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरात (Mahakal Temple) दर्शन घेतले आहे. दर्शन घेतानाचे त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. विराट-अनुष्काने आज पहाटे 4 वाजता भस्मार्ती देखील केली आहे. 

विराट-अनुष्का अनेकदा धार्मिक स्थळांना भेट देत असतात. विविध मंदिरांना भेट देत आशीर्वाद घेत असतात. इंदूर कसोटीनंतर विराट आता पत्नी अनुष्कासह महाकाल ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी उज्जैनला पोहोचला आहे. पहाटे 4 वाजता ते भस्मार्तीमध्ये देखील सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांनी मंदिराच्या गर्भगृहात जाऊन पंचामृत पूजन अभिषेक केला. भोलेनाथाच्या भक्तीत मग्न झालेला विराट-अनुष्काचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Virat Kohli Anushka Sharma Video Viral) होत आहे. दर्शनासाठी दोघांनीही पारंपारिक लुक केला होता. 


महाकालचे दर्शन घेतल्यानंतर अनुष्का शर्मा म्हणाली, “महाकाल देवाचे दर्शन घेतल्याचा खूप आनंद आहे.” विराट आणि अनुष्काची धार्मिक बाबींवर खूप श्रद्धा आहे. धार्मिक स्थळांना भेट दिल्यानंतर त्यांना आनंद आणि समाधान मिळत असतं. विराट आणि अनुष्काने वामिकाविना महाकालेचे दर्शन घेतल्याने त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. तर महाकालचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भक्तांना विराट-अनुष्का देखील दिसल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. 

रुपेरी पडद्यावर कमबॅक करण्यासाठी अनुष्का सज्ज!

महाकालेचे दर्शन घेण्यापूर्वी विराट कोहली आणि अनुष्का शर्माने बाबा नीम करौली यांच्या आश्रमाला भेट दिली होती. त्यावेळीही भक्तीत रमलेल्या जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची लाडकी लेक वामिका सुद्धा होती. त्यानंतर आनंदमाई आश्रमातील काही संतांची त्यांनी भेट घेतली होती. अनुष्का लवकरच झुलन गोस्वामी यांच्या बायोपिकच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. सध्या ती या सिनेमाचं शूटिंग करत आहे. 

संबंधित बातम्या

Mahakaleshwar Temple Video: जीन्सवर साडी गुंडाळून घेतलं महाकालचे दर्शन; व्हिडीओ व्हायरल, जिल्हाधिकाऱ्याने दिले चौकशीचे आदेश





Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here