Rakesh Roshan On Hrithik Roshan Saba Azad Wedding Date Know Hrithik Roshan Saba Azad Love Story

0
13


Rakesh Roshan On Hrithik Roshan Saba Azad : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सबा आझाद (Saba Azad) गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. आता हृतिक आणि सबा लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. दरम्यान हृतिकचे वडील राकेश रोशन (Rakesh Roshan) यांनी या चर्चांवर मौन सोडलं आहे. 

राकेश रोशन काय म्हणाले? 

राकेश रोशन (Rakesh Roshan) म्हणाले की, “हृतिक-सबाच्या लग्नाबद्दल मला काही माहिती नाही, मी ऐकलेलं नाही. सध्या त्यांच्यात फक्त मैत्रीचं नातं आहे. एकमेकांना समजून घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत. लग्न हा भातुकलीचा खेळ नव्हे. लग्न म्हटल्यावर जबाबदारी देखील येते आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करुन हृतिक योग्य तो निर्णय घेईल”. 

हृतिक रोशन-सबा आझाद लव्हस्टोरी (Hrithik Roshan Saba Azad Love Story)

हृतिक आणि सबाची लव्हस्टोरी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरु झाली आहे. सबा ही रॅपर असून तिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. हृतिकला तो व्हिडीओ आवडल्याने त्याने सबासोबत मैत्री केली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. गेल्या काही दिवसांपासून ते एकमेकांना डेट करत असून त्यांनी त्यांचं नातं जगजाहीर केलं आहे. एकमेकांसोबतचे फोटो ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. 

सुझान आणि हृतिक 14 वर्षांनी विभक्त

सबा सोबत रिलेशनमध्ये येण्याआधी हृतिक सुझान खानसोबत लग्नबंधनात अडकला होता. 2000 मध्ये हृतिक आणि सुझानचं लग्न झालं होतं. लग्नाला 14 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. विभक्त झाल्यानंतरही त्यांनी त्यांची मैत्री कायम ठेवली आहे. सुजैन सध्या अर्सलान गोनीसोबत रिलेशनमध्ये आहे. 

हृतिक रोशनचे आगामी सिनेमे (Hrithik Roshan Upcoming Movie)

हृतिकचा ‘विक्रम वेधा’ हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात तो सैफ अली खान, रोहित सराफ आणि राधिका आपटेसोबत झळकला होता. हृतिकचा ‘फायटर’ (Fighter) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तो दीपिका पादुकोण, अनिल कपूर आणि अक्षय ओबेरॉयसोबत दिसणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा सिनेमा पुढील वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

संबंधित बातम्या

Hrithik Roshan : गर्लफ्रेंड सबा आणि मुलांसोबत नवं वर्षाचं स्वागत करण्यासाठी हृतिक रोशन परदेशात रवाना; एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here