Tunisha Sharma Suicide Case Sheezan Khan Gets Bail By Vasai Court Passport To Be Summited

0
18


Sheezan Khan : अभिनेत्री तुनिशा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी शिझान खानला (Sheezan Khan) अखेर जामीन मिळाला आहे. दोन महिने आणि 10 दिवसांनी त्याची तुरुंगातून सुटका होणार आहे. शिझानला जामीन मिळाल्याने कुटुंबियांसह चाहते आनंदी झाले आहेत. त्याच्या कुटुंबियांनी चाहत्यांचे आभार मानले आहेत. 

शिझानला जामीन मिळाल्यानंतर त्याची बहीण फलक नाज (Falaq Naaz) म्हणाली, “शिझानच्या चाहत्यांचे खूप खूप आभार. चाहत्यांनी त्याला खूप पाठिंबा दिला आहे. शिझान अडचणीत असताना खंबीरपणे साथ देणारे चाहते त्याला भेटले आहेत, याचा खरचं अभिमान वाटतो. शिझानचा मोठा चाहतावर्ग असून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी शिझानला पाठिंबा दिला आहे. चाहत्यांनी शिझानला कशी मदत केली आहे हे तो बाहेर आल्यावर त्याला नक्की सांगू”. 

एक लाखाच्या सिक्युरिटी बॉन्डवर शिझानचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. शिझानच्या वकिलांनी 20 फेब्रुवारीला वसई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. जामीनासाठी वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात देखील अर्ज केला होता. तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली शिझानला 25 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती.

शिझानची बहिण फलक नाजदेखील अभिनेत्री आहे. ‘महाकाली – अंत ही आरंभ है’, ‘रूप’, ‘विष या अमृत’, ‘ससुराल सिमर का’ यांसारख्या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. फलकनं काही दिवसांपूर्वी तुनिषाच्या बर्थ-डे निमित्त खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. 

शिझान खानला पोलिसांनी ताब्यात का घेतलं? 

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्माने मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली. आत्महत्येला तिचा मित्र शिझान खान जबाबदार असल्याची तक्रार तिच्या आईने वालीव पोलीस स्थानकात केली. त्यानंतर वसई पोलिसांनी शिझानला ताब्यात घेतलं. 

तुनिषा आणि शिझान ‘अलिबाबा दास्तान-ए-काबुल’ ही मालिका करत होते. या मालिकेच्या शूटिंगदरम्यान ते रिलेशनमध्ये आले. पण काही कारणाने त्यांचा ब्रेकअप झाला. ब्रेकअपनंतर तुनिषाने गळफास घेत आयुष्य संपवलं. तुनिषाच्या आत्महत्येनंतर मालिकेतील कलाकारांसह चाहत्यांना मोठा धक्का बसला. तुनिषाने आत्महत्या केल्यानंतर शिझानवर अनेक आरोप लावण्यात आले होते.

संबंधित बातम्या

Sheezan Khan : तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी शिझान खानला दिलासा; जामीन मंजूर, 2 महिने अन् 10 दिवसांनी तुरुंगातून सुटका





Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here