Kichcha Sudeep Kabzaa Trailer : उपेंद्र (Upendra) आणि किच्चा सुदीपच्या (Kichcha Sudeep) आगामी ‘कब्जा’ (Kabzaa) या सिनेमाची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत असून नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बॉलिवूडचे बादशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनीदेखील हा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे.
‘कब्जा’चा ट्रेलर रिलीज! (Kabzaa Trailer Out)
अॅक्शनचा तडका आणि थरार नाट्य असणारा ‘कब्जा’चा ट्रेलर खूपच उत्कंठावर्धक आहे. या ट्रेलरने चाहत्यांना ‘केजीएफ 2’ची (KGF 2) आठवण येत आहे. नेटकऱ्यांनी तर ‘कब्जा’ला ‘केजीएफ 2’सोबत तुलना करायला सुरुवात केली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून सिनेनिर्माता आनंद पंडित दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. उपेंद्र आणि किच्चा सुदीपला रुपेरी पडद्यावर एकत्र पाहणं ही प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी मिळणार आहे.
‘कब्जा’ कधी होणार रिलीज? (Kabzaa Release Date)
‘कब्जा’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा आर चंद्रुने सांभाळली आहे. तर आनंद पंडितने (Anand Pandit) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. हा सिनेमा येत्या 17 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कन्नड, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी या पाच भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. 17 मार्च 2023 रोजी विनोदवीर कपिल शर्मा आणि नंदिता दासचा ‘ज्विगाटो’ हा सिनेमादेखील रिलीज होणार आहे. त्यामुळे आता बॉक्स ऑफिसवर किच्चा सुदीप आणि कपिल शर्मा आमने-सामने येणार आहेत.
दाक्षिणात्य सुपरस्टार किच्चा सुदीपसह श्रिया सरनदेखील ‘कब्जा’ या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या पॅन इंडिया सिनेमाची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. ‘पठाण’नंतर पुन्हा एकदा हा सिनेमा मनोरंजनसृष्टीला सुगीचे दिवस दाखवेल. किच्चा सुदीपचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. तसेच पाच भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज होत असल्याने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करेल.
अमिताभ बच्चन यांनी शेअर केला ‘कब्जा’चा ट्रेलर
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनीदेखील ‘कब्जा’चा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. ट्रेलर शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,”कब्जा’चा ट्रेलर शेअर करताना खूप आनंद होत आहे. माझा जवळचा मित्र या सिनेमाची निर्मिती करत आहे. तसेच सिनेमातील सर्व कलाकरांना शुभेच्छा”.
T 4574 – Happy to present to you .. the trailer of “Underworld Ka Kabzaa” .. a film produced by my dear friend @anandpandit63 and directed by @rchandru_movies ..
All the best to @nimmaupendra, @NimmaShivanna, @KicchaSudeep & @shriya1109https://t.co/8szKCvvKvf#KabzaaTrailer
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 4, 2023
संबंधित बातम्या