Rift In Uae And Saudi Arab Relations Due To Oil And Yemen War Prince Mohammed Bin Salman Sheikh Mohamed Bin Zayed

  0
  10


  UAE Saudi Arab News : सौदी अरेबिया (Saudi Arab) आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) या दोन देशांतील संबंध ताणलेले असल्याचं दिसत आहे. कधी काळ मित्र असलेल्या या दोन देशांमध्ये सध्या तणाव आहे. दोन्ही देशांचे प्रमुख एकमेकांसमोर येणं टाळत आहेत. या वर्षी जानेवारीमध्ये अबुधाबीमध्ये आखाती देशांच्या नेत्यांची शिखर परिषद झाली. मध्यपूर्वेतील जवळपास सर्व राष्ट्रप्रमुख आणि दिग्गज नेते शिखर परिषदेला पोहोचले होते. मात्र सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान (Prince Mohammed bin Salman) या कार्यक्रमाला अनुपस्थित होते.

  फेब्रुवारी महिन्यामध्ये सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे चीन-अरब शिखर परिषद झाली. UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान या परिषदेला उपस्थित नव्हतं, पण एकेकाळी घनिष्ट मित्र असलेले हे दोन देश एकमेकांविरोधात का आहेत? जाणून घ्या याचं कारण…

  दोन्ही देशांमध्ये का वाढतोय तणाव?

  सौदी अरेबिया आणि UAE हे मित्र राष्ट्र विदेशी गुंतवणूक आणि जागतिक तेल बाजारातील प्रभावासाठी स्पर्धा करतात. या दोन देशांमधील तणाव आणि स्पर्धेचं कारण म्हणजे पैसा आणि सत्ता. तसेच यमन युद्धाबाबत दोन्ही देशांची मतं भिन्न आहेत. युएईला मध्यपूर्वेतील यमन संकट संपवायचं आहे तर, सौदी अरेबिया यमनवर हल्ले सुरू ठेवण्याच्या बाजूने आहे. सौदी अरेबिया आणि UAE हे विदेशी गुंतवणूक आणि जागतिक तेल बाजारातील प्रभावासाठी स्पर्धा करत आहेत.

  संयुक्त अरब अमिरातीने 2019 मध्ये यमनमधून आपलं बहुतेक सैन्य मागे घेतलं आहे, पण तरीही सौदी अरेबियाने यमनवर हल्ले सुरू ठेवण्याच्या बाजूने आहे. संयुक्त अरब अमिराती आपल्या बंदरांपासून उर्वरित जगाकडे जाणारे सागरी मार्ग सुरक्षित करण्यासाठी लाल समुद्रात (Red Sea) वीज प्रकल्प तयार करण्याचा प्रयत्न करत आहे.

  दोन्ही देशांचे प्रमुख एकमेंकांसमोर येणं टाळतायत

  आखाती देशांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांचे राष्ट्राध्यक्ष जाणूनबुजून एकमेकांच्या कार्यक्रमांपासून दूर राहून एकमेंकांसमोर येणं टाळत आहेत. युएईचे अध्यक्ष सौदी अरेबियात झालेल्या चीन-मध्यपूर्व शिखर परिषदेत उपस्थित नव्हते. तर सौदीचे राजपुत्र यूएईमध्ये आयोजित गल्फ समिटमध्ये सहभागी झाले नाहीत. या दोन्ही कार्यक्रमात कतार, जॉर्डन, इजिप्त आणि इतर आखाती देशांचे नेते सहभागी झाले होते. प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचे जवळचे सहकारी आणि युएईचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शेख तहनून बिन झायेद हे देखील या दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यात अयशस्वी ठरले आहेत.

  दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीकडून अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. यूएईचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शेख तहनून बिन झायेद अल नाहयान हे सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या जवळचे सहकारी आहेत. प्रिन्स सलमान यांना भेटण्यासाठी त्यांनी सौदी अरेबियाचे वारंवार दौरेही केले आहेत, पण त्यांना तणाव कमी करण्यात यश आलेलं नाही.

  इराणकडून प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न 

  सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती हे आखाती देशांचे नेतृत्व करणारे देश आहे मात्र, सध्या यांच्यात तणाव सुरु आहे. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील वाढलेल्या तणावाचा फायदा घेत इराण या प्रदेशात आपला प्रभाव वाढवण्याचा झपाट्याने प्रयत्न करत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. याशिवाय ओपेकमध्ये (OPEC) तेल उत्पादनाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. 

  काय आहे पंपिग वाद?

  पेट्रोलियम निर्यात करणार्‍या देशांच्या सौदीच्या नेतृत्वाखालील संघटनेतील ओपेकच्या (OPEC) प्रतिनिधींनी युएईला तेलाचा महसूल वाढवण्यासाठी अधिक तेल पंप करण्यासाठी दबाव आणला आहे, परंतु सौदी अरेबिया तसं करण्यास तयार नाही. संयुक्त अरब अमिरातीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, UAE ने OPEC सोडावं की नाही याबद्दल अंतर्गत वादविवाद चालू आहे. OPEC सोडण्याची चर्चा यूएईमध्ये वर्षानुवर्षे होत आहे. सौदी अरेबियाशी नुकत्याच झालेल्या मतभेदाने हा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.   Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here