Sri Lanka Foreign Minister Ali Sabry Sri Lanka India Vs China Sri Lanka Economic Crisis Hambantota Port

  0
  16


  Sri Lanka India Vs China : श्रीलंकेने (Sri Lanka) पाकिस्तानला (Pakistan) झटका दिला आहे. आमच्यामुळे भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ देणार नाही, असं म्हणत श्रीलंकेने चीनला खडेबोल सुनावले आहेत. भारत विरुद्ध चीन सीमेवरील तणाव काय आहे. असं असताना चीन भारताशेजारील देशांचा वापर करण्याचा प्रयत्न करत असतो. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेने चीनला झापलं आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि श्रीलंकेचे श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री अली साबरी यांची दिल्लीमध्ये भेट झाली. यावेळी श्रीलंकेनं चीनला दणका दिला आहे.

  ‘आमच्यामुळे भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ देणार नाही’

  नवी दिल्ली येथे G20 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री अली साबरी यांनी भारत-चीनबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. अली साबरी म्हणाले, श्रीलंका कोणत्याही देशाला भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या हिताच्या विरोधात आमच्या भूमीचा वापर करू देणार नाही. चीन श्रीलंकेची भूमी भारताविरुद्ध वापरू शकतो, अशी भीती अनेक दिवसांपासून व्यक्त केली जात आहे.

  भारत-चीनबाबत श्रीलंकेचं मोठं वक्तव्य

  भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. सुब्रह्मण्यम जयशंकर यांनी शनिवारी नवी दिल्ली येथे श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद ओवेस मोहम्मद अली साबरी यांची भेट घेतली. दोन्ही मंत्र्यांनी गुंतवणूक, व्यापार आणि विकास भागीदारी यावर विचार विनिमय केला. एस. जयशंकर यांनी एका ट्विटमध्ये सांगितलं की, श्रीलंकेतील आर्थिक सुधारणांबाबत भारताच्या सहकार्यावर या बैठकीत चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी मच्छिमारांच्या प्रश्नांवरही चर्चा केली. जयशंकर यांनी G20 परराष्ट्र मंत्री बैठकीमध्ये सहभागी झाल्याबद्दल साबरी यांचे आभार मानले.

  संकटात मदत केल्याबद्दल भारताचे मानले आभार

  अली साबरी यांनी श्रीलंकेला इतिहासातील सर्वात गंभीर आर्थिक संकटाचा सामना करण्यास मदत केल्याबद्दल भारताचं आभार मानले आणि कौतुक केलं. त्यांनी यावेळी म्हटलं की, गेल्या वर्षी जेव्हा श्रीलंकेवर गंभीर आर्थिक संकट कोसळलं होतं, तेव्हा भारताने श्रीलंकेला सुमारे 4 अब्ज अमेरिकन डॉलर्सची आर्थिक मदत दिली होती, याचा उपयोग अन्न खरेदी आणि इंधन संकट दूर करण्यासाठी झाला.

  भारत-श्रीलंका संबंधांच्या सद्यस्थितीचा आढावा

  अली साबरी म्हणाले, “मी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये भेट घेतली. आमच्यात द्विपक्षीय चर्चा झाली आणि भारत-श्रीलंका संबंधांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.”

  महत्त्वाच्या इतर बातम्या :

  UAE vs Saudi Arab : दोस्त बना दुश्मन… युएई आणि सौदी अरबमध्ये तणाव वाढला, कारण काय?  Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here