Television Actor Sheezan Khan Accused In Television Actress Tunisha Sharma’s Suicide Case Released On Bail From Thane Central Jail

0
7


Tunisha Sharma Suicide Case Sheezan Khan Bail : तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या शिझान खानची (Sheezan Khan) आज ठाणे कारागृहातून सुटका झाली आहे. शिझान गेल्या 70 दिवसांपासून तुरुंगात होता.  24 डिसेंबर रोजी अभिनेत्री तुनिषा शर्माने नायगावमध्ये मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली. त्यानंतर तुनिषाची आई वनिता शर्माने शिझानवर गुन्हा दाखल केला होता. 

शिझानची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्याचे कुटुंबीय भावूक झाले होते. शिझानला घ्यायला त्याची बहिण फलक नाज (Falaq Naaz) आणि शफक नाज (Shafaq Naaz) गेले होते. भावाची सुटका झाल्याने बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. एक लाखाच्या सिक्युरिटी बॉन्डवर शिझानचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

नेमकं प्रकरण काय? 

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्माने मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली. आत्महत्येला तिचा मित्र शिझान खान जबाबदार असल्याची तक्रार तिच्या आईने वालीव पोलीस स्थानकात केली. त्यानंतर वसई पोलिसांनी शिझानला ताब्यात घेतलं. 

तुनिषा आणि शिझान ‘अलिबाबा दास्तान-ए-काबुल’ ही मालिका करत होते. या मालिकेच्या शूटिंगदरम्यान ते रिलेशनमध्ये आले. पण काही कारणाने त्यांचा ब्रेकअप झाला. ब्रेकअपनंतर तुनिषाने गळफास घेत आयुष्य संपवलं. तुनिषाच्या आत्महत्येनंतर मालिकेतील कलाकारांसह चाहत्यांना मोठा धक्का बसला. तुनिषाने आत्महत्या केल्यानंतर शिझानवर अनेक आरोप लावण्यात आले होते.

संबंधित बातम्या

Sheezan Khan : तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी शिझान खानला दिलासा; जामीन मंजूर, 2 महिने अन् 10 दिवसांनी तुरुंगातून सुटका

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here