Russia Ukraine War Ex American President Donald Trump Says I Will Stop Ukraine Conflict In One Day

    0
    8


    Donald Trump On Russia Ukraine War: अमेरिकेचे (America) माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सध्या आपल्या वक्तव्यानं चर्चेत आहेत. ते सत्तेत असते तर रशिया-युक्रेन युद्ध (Russia Ukraine Conflict) झालंच नसतं, असं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प (Former US President Donald Trump)  यांनी केलं आहे. पुन्हा सत्तेत आल्यास रशिया-युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) एका दिवसांत थांबवू, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत. तसेच, रशिया (Russia) –युक्रेन (Ukraine) युद्ध संपवून ते तिसरे महायुद्ध होण्यापासून रोखू शकतात, असा दावाही त्यांनी केला आहे. 

    रशिया-युक्रेन युद्धावर डोनाल्ड (Donald Trump) ट्रम्प यांचा मोठा दावा

    पुढच्या वर्षी अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्ष निवडणुकीत भाग घेण्याची तयारी करत आहे. ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पुन्हा आपली उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच, त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. सध्या ट्रम्प जागोजागी जाऊन आपल्या पक्षाचा अजेंडा सांगत आहेत. अशाच एका कार्यक्रमादरम्यान ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेनमधील युद्धावर वक्तव्य केलं आहे.

    “मी सत्तेत आलो तर तिसरं महायुद्धही होणार नाही”, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानं सारेच अवाक 

    रिपब्लिकन पक्षाच्या एका कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प बोलत होते. ते म्हणाले की, “मी एका दिवसात रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवू शकतो. माझं सरकार आल्यास तिसरं महायुद्धही होणार नाही.” रशिया आणि युक्रेनच्या मुद्द्यावर ट्रम्प यापूर्वीही अनेकदा बोलले आहेत. एका निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की, “जर ते तिथे असते तर रशिया युक्रेनवर हल्ला करू शकला नसता. तसेच, आमच्या काळात शांतता राखण्याचे अनेक प्रयत्न यशस्वी झाल्याचंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. 

    अमेरिका संसद दंगल प्रकरणी ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ 

    ट्रम्प यांच्यावरही सध्या संकटाचे काळे ढग घिरट्या घालत आहेत. अमेरिका संसद दंगल प्रकरणात (US Capitol Riot Case) त्यांच्याविरुद्ध अनेक प्रबळ पुरावे हाती लागले आहेत. पोलीस त्यांच्याविरोधात कधीही गुन्हा दाखल करू शकतात. गुरुवारी (2 मार्च) अमेरिकन जस्टिस डिपार्टमेंटने 6 जानेवारी 2021 रोजी यूएस कॅपिटल येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणात ट्रम्प यांचा दावा नाकारण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी याप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांनी याप्रकरणातून आपली सुटका करण्याची मागणी केली आहे. 



    Source link

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here