Dhaka Explosion : बांगलादेशची राजधानी ढाका येथे मंगळवारी भीषण स्फोट झालाय. या स्फोटात सात जण ठार झाले असून 70 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट एका इमारतीत झाला आहे. घटनेनंतर या घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. या अपघातातली मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, बांग्लादेशातील चितगाव येथे शनिवारी देखील एका ऑक्सिजन प्लांटमध्ये स्फोट झाला होता. या स्फोटानंतर लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला होता तर 30 हून अधिक जण जखमी झाले होते. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, सीताकुंडा उपजिल्ह्यातील केशबपूर भागातील ऑक्सिजन प्लांटमध्ये दुपारी 4.30 वाजता स्फोटाचा आवाज ऐकू आला. यानंतर आग लागली. ही घटना ताजी असतानाच आता अशीच दुसरी घटना घडली आहे. फेब्रुवारी महिन्या देखील ढाका येथील एका निवासी इमारतीला आग लागली होती. या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले आहे.
At least 7 people killed, over 70 people injured in an explosion at a building in Bangladesh’s Dhaka: Local media
— ANI (@ANI) March 7, 2023
अग्निशमन दलाचे अधिकारी रशीद बिन खालिद यांनी सांगितले की, अग्निशमन दलाच्या अकरा तुकड्या घटनास्थळी बचाव कार्य करण्यासाठी कार्यरत आहेत. स्फोट झालेली इमारत पाच मजली असून त्यातील तळमजल्यावर एक सॅनिटरी दुकान आहे. शिवाय एका बँकेचे कार्यालय देखील आहे. या स्फोटामुळे बॅंकेचे कार्यालय आणि दुकानाला आग लागली आहे. बीआरटीसी बस काउंटरजवळ दुपारी 4.45 च्या सुमारास हा स्फोट झाला. DMCH पोलिस चौकीचे प्रभारी निरीक्षक बच्चू मिया यांनी सांगितले की, आतापर्यंत सात मृतदेह बाहेर काढले असून 70 हून अधिक जखमींना ढाका मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. स्फोटाचे कारण लगेच समजू शकले नाही.
पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश जखमींवर हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात उपचार सुरू आहेत. ज्या इमारतीत स्फोट झाला त्या इमारतीच्या तळमजल्यावर सॅनिटरी उत्पादनांची अनेक दुकाने आहेत. त्याच्या शेजारी बँकेची शाखाही आहे. स्फोटामुळे रस्त्यालगत उभ्या असलेल्या बसचेही नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
महत्वाच्या बातम्या
धुलीवंदनला जावयाची गाढवावरून जंगी मिरवणूक, बीडमधील विड्या गावची अनोखी प्रथा