US Banking Crisis Silicon Valley Bank Shut Down By Regulator FDIC USA Bank Marathi News

  0
  8


  Silicon Valley Bank: अमेरिकेत बँकिंग व्यवस्था संकटात आल्याचं चित्र निर्माण झालं असून सिलिकॉन व्हॅली बँकेच्या शेअर्समध्ये एकाच दिवसात 70 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे अमेरिकन रेग्युलेटर्सकडून देशातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेली सिलिकॉन व्हॅली बँक बंद करण्याचे आदेश दिले आहेत. सिलिकॉन व्हॅली बँक (SVB) नियामकांद्वारे बंद करण्यात आली आहे, आणि तिची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, असं फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (FDIC) ने त्याच्या निवेदनात म्हटलं आहे. 

  कॅलिफोर्निया डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल प्रोटेक्शन अँड इनोव्हेशनने ही बँक बंद करण्याचा आदेश जारी केले आहेत. सिलिकॉन व्हॅली बँक ही अमेरिकेतील 16 वी सर्वात मोठी बँक आहे. बँकेची मालमत्ता सुमारे 210 अब्ज डॉलर्स इतकी आहे. ही देशातील आघाडीची बँक आहे जी नवीन-युगातील तंत्रज्ञान कंपन्या आणि उद्यम भांडवल गुंतवणूक कंपन्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करते.

  एकाच दिवसात शेअर्स 70 टक्क्यांनी घसरले

  अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँकेची पॅरेंट कंपनी एसव्हीबी फायनान्शियल ग्रुपच्या शेअर्समध्ये आज 70 टक्क्यांची घसरण झाली आहे. ही बँक विशेषतः टेक स्टार्टअप्सना कर्ज देते. त्याचे मुख्यालय कॅलिफोर्निया येथे आहे. बँकेने बुधवारी 2.25 अब्ज किमतीचे शेअर्स विकले होतो. त्यामध्ये यूएस ट्रेझरी आणि मॉर्टगेज बॅक्ड सिक्युरिटीज देखील समाविष्ट होते. त्यानंतर या बँकेचे शेअर्स 70 टक्क्यांनी घसरले. यामुळे एका झटक्यात बँकेचे मार्केट कॅप 80 अब्ज डॉलर्सने कमी झाले. 

  अमेरिकेतील या घटनेचा परिणाम आता जगभरातील बाजारावर होताना दिसत आहे. आज भारतीय शेअर बाजारातील समभागामध्येही मोठी घसरण झाल्याची दिसून आलं आहे. 

  गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकेतील फेडने त्याच्या व्याजदरात वाढ केल्याचा फटका अनेक बँकांना बसल्याचं दिसून येतंय. एसव्हीजीचे क्लायंट प्रामुख्याने यूएस स्टार्टअप कंपन्या आहेत. बँकेचे लक्ष सिलिकॉन व्हॅली आणि टेक स्टार्टअप्सवर आहे. कंपनी आपला बहुतेक व्यवसाय यूएसमध्ये उद्यम भांडवल-बॅक्ड स्टार्टअपसह करते. पण स्टार्टअप्स त्यांचे पैसे बँकेतून काढत आहेत. अमेरिकेत SVB च्या बेलआउटची मागणी आहे. मूडीजने SVB फायनान्शियल ग्रुपचे रेटिंग कमी केले आहे. त्यामुळे बरेच लोक या संकटाची तुलना लेहमन ब्रदर्स आणि एन्रॉन कॉर्पोरेशनशी करत आहेत. अमेरिकेतील व्याजदर वाढले असताना आणि मंदी येण्याची शक्यता असताना हे संकट आले आहे.

  ही बातमी वाचा:   Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here