Russia Ukraine War Vladimir Putin May Launch Nuclear Attack To Destroy Ukraine Marathi News

  0
  23


  Russia Ukraine War: रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) युद्ध थांबण्याचं नाव घेत नाही आहे. यादरम्यान आता अमेरिकन गुप्तचर विभागानं (American Intelligence Services) मोठा दावा केला आहे. जर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन  (Vladimir Putin) जिंकले नाहीत तर हे युद्ध संपवण्यासाठी आणि युक्रेनला उद्ध्वस्त करण्यासाठी ते अण्वस्त्र हल्लाही (Nuclear Attack) करू शकतात, असं अमेरिकेच्या गुप्तचर विभागाचं म्हणणं आहे.

  दरम्यान, अमेरिकेच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख इर्विन हेन्स (Irwin Haynes) यांनी दावा केला आहे की, दीर्घकाळ चाललेल्या युद्धामुळे रशियाचं नुकसान वाढत आहे. आत्तापर्यंत रशियानं दीड लाखांहून अधिक सैनिक गमावले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आर्थिक नुकसानही जास्त आहे.

  लांबलेल्या युद्धामुळं पुतिन त्रस्त 

  अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, पुतिन हे युद्ध तीन दिवसांतच संपवण्याचा विचार करत होते, मात्र आता युद्धाला एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. अशा स्थितीत ते आता अणुबॉम्बचा वापर करून युद्ध संपवण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे युक्रेनची चिंता अधिकच वाढली आहे.

  मी सत्तेत आलो तर फक्त एकाच दिवसांत रशिया-युक्रेन युद्ध संपवीन : डोनाल्ड ट्रम्प

  अमेरिकेचे (America) माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सध्या आपल्या वक्तव्यानं चर्चेत आहेत. ते सत्तेत असते तर रशिया-युक्रेन युद्ध (Russia Ukraine Conflict) झालंच नसतं, असं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प (Former US President Donald Trump)  यांनी केलं आहे. पुन्हा सत्तेत आल्यास रशिया-युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) एका दिवसांत थांबवू, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत. तसेच, रशिया (Russia) -युक्रेन (Ukraine) युद्ध संपवून ते तिसरे महायुद्ध होण्यापासून रोखू शकतात, असा दावाही त्यांनी केला आहे.   Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here