Doha IndiGo Flight Diverted : इंडिगो कंपनीच्या (IndiGo Flight) दोहाला (Doha) जाणाऱ्या विमानाचं कराचीमध्ये (Karachi) इमर्जंन्सी लँडिग (Emergency Landing) करण्यात आलं. विमानातील एका प्रवाशाची तब्येत अचानक बिघडल्याने (Medical Emergency) दोहाला जाणारं हे विमान कराचीला वळवण्यात आलं. मात्र, प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, एअरलाईन कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, इमर्जंन्सी लँडिगनंतर मेडिकल टीमने प्रवाशाची तपासणी केली असता, त्याला मृत घोषित केलं. सुत्रांच्या माहितीनुसार, हा प्रवासी नायजेरियाचा नागरिक असल्याची माहिती समोर येत आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे. यानुसार, वैद्यकीय आणीबाणीमुळे पाकिस्तानमध्ये विमानाचं इमर्जन्सी लँडिग करण्यात आलं. दोहाला जाणारं इंडिगोचं विमान कराचीला वळवण्यात आलं. दिल्लीहून दोहाला जाणारी इंडिगो फ्लाईट 6E-1736 वैद्यकीय आणीबाणीमुळे कराचीला वळवण्यात आलं. दुर्दैवाने विमानाच्या लँडिंगनंतर विमानतळावरील वैद्यकीय पथकाने प्रवाशाला मृत घोषित केलं, असं एअरलाइन्सने सांगितलं आहे.
IndiGo flight 6E-1736, operating from Delhi to Doha was diverted to Karachi due to a medical emergency on board. Unfortunately, on arrival, the passenger was declared dead by the airport medical team, says the airline.
— ANI (@ANI) March 13, 2023
Reels
विमानातील प्रवाशाचा मृत्यू
इंडिगो कंपनीने याबाबत निवेदन जारी करत म्हटलं आहे की, नवी दिल्लीहून दोहाला जाणारं इंडिगो एअरलाईन्सचे विमान 6E-1736 हे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे पाकिस्तानातील कराची शहरात वळवण्यात आलं. प्रवाशाची तब्येत बिघडल्याने विमान कराचीला वळवल इमर्जंन्सी लँडिग करण्यात आलं. दरम्यान, फ्लाईट लँड होताच विमानतळाच्या वैद्यकीय पथकाने आजारी प्रवाशाची तपासणी करत प्रवाशाचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं.
कंपनीने प्रवाशाचा कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. “आम्ही या बातमीने खूप दुःखी झालो आहोत आणि आमच्या संवेदना त्याच्या कुटुंबीयांसह आणि प्रियजनांसोबत आहेत. आम्ही सध्या संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहोत आणि फ्लाईटमधील इतर प्रवाशांच्या प्रवासाची व्यवस्था करत आहोत,” असे इंडिगोनं निवेदनात म्हटलं आहे.
मृत प्रवासी नायजेरियन नागरिक
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशाची अचानक तब्येत बिघडल्याने प्रवाशाला वाचवण्यासाठी हे लँडिंग करण्यात आलं. कराचीमध्ये इमर्जन्सी लँडिंग केल्यानंतर विमानतळावरील वैद्यकीय पथकाने प्रवाशाला मृत घोषित केलं. त्यानंतर इंडिगो फ्लाईटने मृत प्रवाशासह दिल्लीला परत उड्डाण केलं. हा प्रवासी नायजेरियन नागरिक आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :