Donald Trump Wrote I Am Back On Facebook Message After Lift Ban From Facebook And Youtube Platform

    0
    3


    Donald Trump post on Youtube and Facebook: अमेरिकेचे (America) माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी दोन वर्षांनंतर शुक्रवारी (17 मार्च) फेसबुक (Facebook) आणि यूट्यूबवर (YouTube) पुनरागमन केलं आहे. त्यांनी एक पोस्ट लिहिली आहे. यूएस कॅपिटल हिंसाचारानंतर (US Capitol Violence) डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर बंदी घालण्यात आली होती. अखेर शुक्रवारी त्यांच्या खात्यावरील बंदी उठवण्यात आली. बंदी उठवताच ट्रम्प फेसबुक आणि यूट्यूब अकाऊंटवर सक्रिय झाले आहेत. 

    ट्रम्प यांनी सोशल मीडियावर “मी परत आलोय.” असा उल्लेख करत पोस्ट केली आहे. तसेच, त्यांनी पोस्ट करताना एक व्हिडीओही शेअर केला आहे. 2016 च्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर विजयी भाषण देतानाचा एक व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी त्यांच्या व्हिडीओची एक 12 सेकंदांची क्लिप शेअर केली आहे. “तुम्हाला इतका वेळ वाट पाहण्यास लावल्याबद्दल क्षमस्व”, असं ट्रम्प यांनी त्या भाषणाच्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. 

    युट्यूबवर 2.6 मिलियन सब्सक्रायबर्स

    रिपब्लिकन पक्षाचे 76 वर्षीय नेते डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरले आहेत. ट्रम्प यांचे फेसबुकवर तब्बल 34 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर युट्यूबवर त्यांचे 2.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. 6 जानेवारी 2021 रोजी जो बायडन यांच्या विजयानंतर ट्रम्प यांच्या समर्थकांनी यूएस कॅपिटलवर हल्ला केला होता. याच हिंसाचार प्रकरणी कारवाई करत डोनाल्ड ट्रम्प यांचे सोशल मीडिया अकाऊंट्सवर बंदी घालण्यात आली होती. 

    YouTube नं अकाऊंट रिस्टोअर करत दिला ‘हा’ मेसेज

    YouTube ने ट्रम्प यांचं अकाऊंट रिस्टोअर केलं. त्यानंतर युट्यूबने त्यांना एक मेसेजही केला आहे. “आजपासून, डोनाल्ड जे. ट्रम्प चॅनल यापुढे Restricted नाही. तुम्ही नवा कंटेन्ट अपलोड करु शकता.” तसेच, सोशल नेटवर्किंग जायंट मेटानं जानेवारीमध्ये घोषणा केली होती की, ते फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाऊंंट्सवरील बंदी हटवत आहेत.” 

    ट्रम्प यांनी बंदीनंतर ट्रुथ सोशल (Truth Social) लॉन्च केला

    87 मिलियन फॉलोअर्स असलेलं डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंटही यूएस कॅपिटल हिंसाचारानंतर ब्लॉक करण्यात आलं होतं. यानंतर त्यांनी स्वतःचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशल लाँच केलं होतं. त्यानंतर, जेव्हा ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतला. त्यावेळी त्यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ट्रम्प यांचं बंद केलेलं ट्विटर अकाऊंट रिस्टोअर केलं होतं. परंतु त्यांनी अद्याप पोस्ट केलेली नाही. 2016 मध्ये ट्रम्प यांच्या धक्कादायक विजयाचं श्रेय सोशल मीडियावरील त्यांच्या डिजिटल प्रचाराला दिलं जातं. 



    Source link

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here