IMRAN KHAN Accident Between Vehicles In Imran Khan Convoy Pakistan News

    0
    5


    Imran Khan Convoy Accident : पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान आणि पीटीआय पक्षाचे प्रमुख इम्रान खान (Imran Khan) यांच्या ताफ्याचा अपघात झाला आहे. इम्रान खान यांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांवर आदळून हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आज तोशाखाना प्रकरणी उपस्थित राहण्यासाठी इस्लामाबादला जाणार आहेत. मात्र वाटेत त्यांच्या ताफ्याचा अपघात झाला. त्यांच्या ताफ्यातील अनेक वाहने एकमेकांवर आदळली. मात्र, या दुघटनेत इम्रान खान पूर्णपणे सुरक्षित असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

    इम्रान खान यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात

    मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान खानच्या ताफ्यातील वाहने एकमेकांवर आदळून हा  हा अपघात झाला आहे. ताफ्यातील दोन वाहने एकमेकांवर आदळली, त्यापैकी एक वाहन पूर्णपणे उलटलं आणि काही तीन जखमी झाले. माजी पंतप्रधान इम्रान खान तोशाखाना प्रकरणात हजर राहण्यासाठी लाहोरहून इस्लामाबादला जात असताना ही घटना घडली. मात्र, माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या गाडीचा अपघात झालेला नाही, तर त्यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचा अपघात झाला आहे.

    इम्रान खान यांचं ट्वीट

    कोर्टा जाण्यासाठी घरातून निघण्यापूर्वी इम्रान खान यांनी ट्विट केलं होतं. त्यामध्ये त्यांनी लिहिलं की, “मला सर्व प्रकरणांमध्ये जामीन मिळाला असूनही, पीडीएम सरकार मला अटक करू इच्छित आहे. त्यांचा दुष्ट हेतू माहीत असूनही, माझा कायद्याच्या राज्यावर विश्वास असल्याने मी न्यायालयात जात आहे, मात्र या बदमाशांच्या टोळीचा हेतू सर्वांना स्पष्ट झाला पाहिजे.”

    इम्रान खान म्हणाले, “यावरून हे स्पष्ट होते की, मी निवडणुकीत प्रचाराचं नेतृत्व करू शकत नाही. न्यायालया गेल्यानंतर मला तुरुंगात नेण्यासाठी लोहारला घेराव घालण्यात आला आहे.”

    महत्त्वाच्या इतर बातम्या :

    North Korea : हुकूमशाह किम जोंग उन युद्धाचं रणशिंग फुंकणार? अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील तणाव वाढला, किमची सेना सज्ज

     





    Source link

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here