Google Doodle Celebrates Dr Mario Molina Who Helped Save The Ozone Layer Know About Him

    0
    4


    Google Doodle Dr. Mario Molina : आज मेक्सिकन रसायनशास्त्रज्ञ डॉ. मारियो मोलिना यांची  80 वी जयंती आहे.  त्यांनी ग्रहाचा ओझोन थर वाचवण्यासाठी काम केले. डॉ. मोलिना यांना 1995 मध्ये रसायनशास्त्र विभागातील नोबेल पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यांनी रसायने हे पृथ्वीच्या ओझोन कवचाचा ऱ्हास कसा करतात हे उघड केले. ओझोन हे मानव, वनस्पती आणि वन्यजीवांना हानिकारक अल्ट्रा व्हायलेंट किरणांपासून संरक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

    इंटरनेट सर्च इंजिन असलेलं गुगल (Google) आज जगातील सर्वात मोठं प्लॅटफॉर्म म्हणून ओळखलं जातं. गुगलचे (Google Doodle) विविध डिझाइन्सचे डूडल अनेकांचे लक्ष वेधतात. गुगलकडून विविध दिनविशेषानिमित्त साधत गुगल डुडल तयार केलं जातं

    जाणून घेऊयात मरिनो यांच्याबद्दल

    • डॉ. मोलिना यांचा जन्म 1943 रोजी मेक्सिको सिटी येथे झाला. लहानपणी त्यांना विज्ञानाची इतकी आवड होती.
    • डॉ. मोलिना यांनी मेक्सिकोच्या नॅशनल ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीमधून रासायनिक अभियांत्रिकीची पदवी आणि जर्मनीतील फ्रीबर्ग विद्यापीठातून पदवी मिळवली.
    • शिक्षण पूर्ण केल्यानंतर, कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथे पोस्टडॉक्टरल संशोधन करण्यासाठी अमेरिकेत गेले.
    • 1970 च्या सुरुवातीस, डॉ. मोलिना यांनी कृत्रिम रसायनांचा पृथ्वीच्या वातावरणावर कसा परिणाम होतो यावर, संशोधन सुरू केले.
    • ग्रहाचा ओझोन थर पुढील काही दशकांमध्ये पूर्णपणे रिकव्हर होण्याच्या मार्गावर आहे. असं डॉ. मोलिना यांनी आपल्या संशोधनात स्पष्ट केलं. 

    गूगल डूडलचं डिझाइन

    गूगल डूडलमध्ये गूगलच्या स्पेलिंगमधील O हा सूर्याच्या इमोजीचा दिसत आहे.तर डूडलमध्ये मारियो मोलिना यांचा फोटो देखील दिसत आहे. या डूडलमध्ये स्पे फ्रिजचं चित्र देखील आहे. 7 ऑक्टोबर 2020 रोजी मोलिना यांचे मेक्सिकोमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले.



    Source link

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here