Indian Embassy At London High Commission Puts Up Huge Tiranga After Khalistaners Attack The Tricolour Video Viral

  0
  15


  Indian Flag in Britain : ब्रिटनमधील भारतीय दूतावासाने खलिस्तानी समर्थकांना चांगलीच चपराक बसवली आहे. लंडनमधील (London) भारतीय दूतावासाने उच्चायुक्तालयाच्या इमारतीवर मोठा तिरंगा फडकावला आहे. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर फडकावलेला तिरंगा रविवारी फुटीरतावादी खलिस्तानी समर्थकांनी (Pro Khalistani Protestors) खाली उतरवला होता. याला चोख प्रत्युत्तर देत उच्चायुक्तालयावर आता दूतावासाने आधीच्या झेंड्यांच्या आकारापेक्षाही मोठ्या आकाराचा झेंडा फडकावला आहे. रविवारी खलिस्तान समर्थकांनी घोषणाबाजी करत भारतीय दूतावासाच्या इमारतीवर हल्ला करत राष्ट्रध्वज खाली उतरवला होता. या घटनेनंतर भारतात संतापाची लाट पसरली होती. आता भारतीय दूतावासाने खलिस्तानींना चांगलीच चपराक दिली आहे.

  लंडनमधील भारतीय दूतावासात फडकवला तिरंगा

  ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयावर रविवारी खलिस्तानी समर्थकांनी हल्ला केला. दूतावासाच्या इमारतीवर हल्ला करत तेथे तोडफोड केली. इतकंच नाही तर खलिस्तान समर्थकांनी भारतीय राष्ट्रध्वजाचाही अपमान केला. उच्चायुक्त कार्यालयावरील भारताचा राष्ट्रध्वज खाली उतरवत त्यांनी तिथे खलिस्तानी झेंडे फडकवले. या घटनेचा भारतात निषेध व्यक्त करून कारवाईची मागणी करण्यात आली होती.

  पाहा व्हायरल व्हिडीओ :

  आता पूर्वीपेक्षा मोठा तिरंगा फडकावून खलिस्तानींना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. याआधी रविवारी अनेक व्हिडीओ समोर आले होते. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांलयावरील तिरंगा हटवण्यात आल्याचं या व्हिडीओंमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. तिरंग्याच्या जागी खलिस्तानी ध्वज लावण्यात आला होता. भारतात खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंहला पंजाब पोलिसांनी फरार घोषित केलं. त्यानंतर त्याच्या अटकेची कारवाई रोखण्यासाठी ब्रिटनमध्ये खलिस्तानी समर्थकांनी गोंधळ घातला.

  काय आहे संपूर्ण प्रकरण?

  ब्रिटनमधील खलिस्तान समर्थकांच्या एका गटाने रविवारी (19 मार्च) भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने करत फुटीरतावादी नेता अमृतपाल सिंहच्या समर्थनार्थ झेंडे आणि पोस्टर झळकवत घोषणाबाजी केली. भारतीय उच्चायुक्ताबाहेर निदर्शने करत असताना खलिस्तान समर्थकांनी गोंधळ घातला. यावेळी त्यांनी भारतविरोधी घोषणाही दिल्या. व्हायरल व्हिडीओमध्ये एक खलिस्तानी भारताचा ध्वज उतरवताना दिसत आहे. खलिस्तानी समर्थकांचं निदर्शन रोखण्यासाठी पोलीसही घटनास्थळी पोहोचले होते.

  अमृतपाल सिंहसह त्याच्या समर्थकांना अटक

  पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  खलिस्तानी नेता अमृतपालच्या अटकेसाठी शोधमोहिम सुरु आहे. मात्र, पंजाब पोलिसांनी अमृतपाल सिंहला अटक केल्याचा दावा त्याच्या वकीलाने केला आहे. दरम्यान, अमृतपालच्या एकूण 112 समर्थकांना अटक करण्यात आली आहे, हे सर्व अमृतपाल सिंग यांचे कट्टर समर्थक मानलं जातात. मात्र, सध्या खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

  Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here