मुंबई : आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या एक्सेंजर (Accenture) कंपनीने त्यांच्या 19,000 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याची घोषणा केली आहे. ही संख्या कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 2.5 टक्के इतकी आहे. याशिवाय कंपनीने आपली वार्षिक कमाई आणि नफ्याच्या अंदाजातही कपात केली आहे. कंपनीचा वाढत चाललेला तोटा कमी करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येतंय. याआधी अॅमेझॉनने (Amazon) त्याच्या 9,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची घोषणा केली होती. टेक कंपन्यांकडून इतक्या मोठ्या प्रमाणात सातत्याने होणारी नोकरकपात म्हणजे जागतिक मंदीची चाहूल असल्याचं सांगितलं जातंय.
रॉयटर्स या वृत्तसमूहाने या संदर्भातील वृत्त दिलं असून त्यामध्ये म्हटलंय की, एक्सेंजर कंपनीने आपली महसूल वाढ आणि नफ्याचा अंदाजही कमी केला आहे.
BREAKING: Accenture to cut 19,000 jobs
— The Spectator Index (@spectatorindex) March 23, 2023
या वर्षी मंदीच्या सावटाखाली असलेल्या आयटी क्षेत्रातल्या लाखो कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या. Amazon, Meta, Microsoft आणि इतर कंपन्यांनी लाखो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. तीन दिवसांपूर्वी अमेझॉनने त्याच्या 9,000 कर्मचाऱ्यांना कमी केल्याचं जाहीर केलं होतं. अमेझॉनची ही दुसरी कर्मचारी कपात असून त्या आधी जानेवारी महिन्यात कंपनीने 18,000 कर्मचारी कपातीची घोषणा केली होती.
ही बातमी वाचा: