World Meteorological Day 2023 Know History Significance And Importance Of The Day Marathi News

    0
    19


    World Meteorological Day 2023 : आज जगभरात ‘जागतिक हवामान दिन’ साजरा केला जात आहे. 23 मार्च 1950 रोजी जागतिक हवामान संस्था  ( World Meteorological Organization-WMO) स्थापन झाली होती. त्यामुळे 23 मार्च हा जागतिक हवामान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. मागील काही वर्षांपासून हवामान बदलामुळे मानव जातीसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर जागतिक हवामान दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. ही संस्था पूर, दुष्काळ आणि भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा अंदाज घेण्यासाठी वापरली जाते. जेणेकरून होणाऱ्या नुकसानीपासून बचाव होऊ शकेल. दरवर्षी जागतिक हवामान दिवसाची एक थीम निश्चित केली जाते. यंदाच्या वर्षी “The Future of Weather, Climate and Water across Generations” ही थीम ठेवण्यात आली आहे.

    जागतिक हवामान दिनाचा इतिहास (World Meteorological Day History 2023) :

    जागतिक हवामान दिवस दरवर्षी 23 मार्च 1950 रोजी स्थापन झालेल्या WMO च्या स्थापना दिनाच्या दिवशी साजरा केला जातो. स्वित्झर्लंड येथील जिनेव्हामध्ये याचे मुख्यालय आहे.  WMO ही संस्था सन 1951 मध्ये संयुक्त राष्ट्राची (UN) विशेष संस्था बनली.  पहिला जागतिक हवामान दिवस 23 मार्च 1961 रोजी साजरा करण्यात आला. या आंतरराष्ट्रीय संघटनेचे सध्या 193 देश सदस्य राष्ट्रे आहेत. WMO ची स्थापना झाली तेव्हा 31 देश सदस्य होते. यामध्ये भारताचाही समावेश होता. ही संघटना पूर, दुष्काळ आणि भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा अंदाज लावण्यास मदत करते जेणेकरून लोकं त्यांच्यासाठी तयार होऊ शकतील आणि कोणतेही नुकसान होणार नाही.

    जागतिक हवामान दिनाचे महत्त्व (World Meteorological Day Importance 2023) :

    जागतिक हवामान दिन हा आपल्या पृथ्वीला भेडसावणाऱ्या हवामान बदल, जंगलतोड, अतिप्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग इत्यादी अनेक समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा दिवस आहे. जागतिक स्तरावर 191हून अधिक देशांमध्ये जागतिक हवामान दिवस साजरा केला जातो. पर्यावरणीय स्थितीबद्दल जागरूकता वाढवण्याच्या अनुषंगाने या दिवसाचे महत्त्व आहे. योग्य वेळी खबरदारी आणि पावले उचलल्यास पृथ्वीवरील अनेक जीव वाचू शकतात. हवामान बदलामुळे जगातील अनेक भागांमध्ये चिंताजनक पर्यावरणीय बदल घडत आहेत. वाढत्या शहरीकरणात पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे जागतिक हवामानशास्त्र संस्थेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले. 

    जागतिक हवामान दिनाची थीम (World Meteorological Day Theme 2023) :

    दरवर्षी जागतिक हवामान दिनाची थीम वेगवेगळी ठरविण्यात येते. त्यानुसार 2023 या वर्षाची थीम “पिढ्यानपिढ्या हवामान, हवामान आणि पाण्याचे भविष्य” (“The Future of Weather, Climate and Water across Generations”) अशी आहे.

    महत्त्वाच्या बातम्या : 

    Important Days in March 2023 : ‘जागतिक महिला दिन’ आणि ‘होळी’सह मार्च महिन्यातील हे आहेत महत्त्वाचे दिवस; वाचा संपूर्ण यादी



    Source link

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here