Asteroid Close To Earth 200 Feet Wide Asteroid To Fly In Between Earth And The Moon On March 25 There Chances Of Hitting Us

    0
    19


    Asteroid Close to Earth : पृथ्वीच्या (Earth) दिशेने एक संकट पुढे सरकत आहे. कुतुबमिनार एवढ्या आकाराचा 200 फूट मोठा ॲस्टरॉयड (Asteroid) पृथ्वीच्या दिशेने येत आहे. नासाच्या (NASA) खगोलशास्त्रज्ञांनी याबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. हा सुमारे 200 फूट मोठा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची ही भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. अनेकदा लघुग्रह अवकाशातून पृथ्वीवर आदळण्याच्या भीतीने शास्त्रज्ञांची झोप उडते. आता एक मोठा लघुग्रह पृथ्वीच्या जवळ येत असल्याचं खगोलशास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. हा लघुग्रह या आठवड्याच्या शेवटीच पृथ्वी आणि चंद्राच्या कक्षेतून जाणार आहे. जर हा लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेत शिरला आणि पृथ्वीवर आदळला तर तो एखादं संपूर्ण शहर नष्ट करू शकतो.

    पृथ्वीच्या दिशेने सरकतोय कुतुबमिनार एवढा मोठा Asteroid

    अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या शास्त्रज्ञांनी पृथ्वीवर येणाऱ्या संकटाचा अंदाज वर्तवला आहे. नासाच्या शास्त्रज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, या आठवड्याच्या शेवटी पृथ्वी आणि चंद्राच्या कक्षेजवळून जाणार असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान हा लघुग्रह पृथ्वीवर आदळणार असल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. हा लघुग्रह अतिशय वेगाने पुढे सरकत असून त्याच्या समोर येणाऱ्या खगोलीय पिंड किंवा ग्रहाचा नाश करेल. खगोलशास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, सध्या हा लघुग्रह अंतराळात 100,000 मैल (168,000 किलोमीटर) अंतरावर आहे. हे अंतर इथून चंद्रापर्यंतच्या अंतराच्या निम्म्याहून कमी आहे, त्यामुळे ते दुर्बिणी (एक प्रकारची दुर्बिणी) आणि छोट्या दुर्बिणीतूनही दिसेल.

    What is Asteroid : ॲस्टरॉयड म्हणजे काय?

    ॲस्टरॉयड (Asteroid) म्हणजेच लघुग्रह. लघुग्रह किंवा उल्का या बद्दल तुम्ही ऐकलं असेल. लघुग्रह किंवा उल्का हे असे खगोलीय पिंड आहे जे अवकाशात आपल्या सौरमालेत फिरत राहते. सूर्यमालेतील इतर ग्रहांप्रमाणेच सूर्याभोवती फिरतात.

    दुर्मिळ खगोलीय घटना

    अवकाशात अनेक लघुग्रह फिरत असतात. ॲस्टरॉयड जवळून जाणं ही खगोलीय घटना आहेत. पण एवढ्या मोठ्या आकाराचा लघुग्रह पृथ्वी जवळून जाणार ही फार दुर्मिळ घटना आहे, असं नासानं म्हटलं आहे. अशी खगोलीय घटना दशकातून फक्त एकदाच घडते. शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की, या लघुग्रहाचा आकार 40 ते 90 मीटर व्यासाचा आहे.

    2023 DZ2 ॲस्टरॉयड पृथ्वी जवळून जाणार

    नासाने शोधलेल्या या लघुग्रहाचं नाव 2023 DZ2 आहे. NASA नं सांगितलं की, 2023 DW लघुग्रह पृथ्वीच्या जवळ येत आहे. नासाने लघुग्रहाचं निरीक्षण केलं असून हा लघुग्रह लवकरच पृथ्वीच्या जवळून जाण्याची शक्यता आहे. नासाने एका महिन्यापूर्वी 2023 DZ2 नावाचा लघुग्रह शोधला आहे. हा लघुग्रह शनिवारी अमेरिकन स्थानिक वेळेनुसार चंद्राच्या 515,000 किमी जवळून जाण्याची शक्यता आहे. हा लघुग्रह सुमारे 28,000 किमी/तास वेगाने पृथ्वीच्या दिशेने पुढे सरकत आहे.

    पृथ्वी आणि चंद्राच्या जवळून जाणार लघुग्रह

    खगोलशास्त्रज्ञांच्या मते, 2023 DZ2 लघुग्रह शनिवारी चंद्राच्या कक्षेपासून 320,000 मैल (515,000 किलोमीटर) अंतरावर जाईल आणि त्यानंतर काही तासांने हा हिंद महासागराजवळू सुमारे 17,500 मैल प्रति तास वेगाने जाईल. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वी आणि चंद्राच्या जवळून हा ॲस्टरॉयड जाणार आहे. पृथ्वी जवळून लघुग्रह जाणे ही एक सामान्य घटना आहे. या लघुग्रहाचा आकार 130 फूट आणि 300 फूट किंवा त्याहूनही अधिक असू शकतो. म्हणजेच तो कुतुबमिनार इतका मोठा असू शकतो ज्याची उंची 73 मीटर (239.5 फूट) असण्याची शक्यता आहे.

    लाईव्ह वेबकास्टमध्ये पाहता येणार

    युरोपियन स्पेस एजन्सीचे प्लॅनेटरी डिफेन्सचे प्रमुख रिचर्ड मॉइसेल यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “पृथ्वीजवळ येणारा लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यास एखादं शहर नष्ट करू शकतो, पण या क्षणी तो पृथ्वीवर आदळण्याची शक्यता फार कमी आहे. ही खगोल शास्त्रज्ञांसाठी  निरीक्षण करण्याची एक उत्तम संधी असेल. व्हर्च्युअल टेलिस्कोप प्रोजक्टद्वारे ही खगोलीय घटना पाहता येणार आहे.”



    Source link

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here