Twitter To Revoke Legacy Verified Badges From Next Month Twitter To End Verification System That Gave Blue Check Marks To Notable Accounts

  0
  23


  Twitter to Revoke Legacy Verified Account : मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने युजर्सना पुन्हा एकदा मोठा झटका दिला आहे. 1 एप्रिलपासून सशुल्क सबस्क्रिप्शन नसणाऱ्या ट्विटर वापरकर्त्यांच्या अकाऊंट्सचे ब्लू टिक हटवण्यास सुरुवात करणार आहे. ट्विटरकडून परिपत्रक जारी करत नवीन सूचना देण्यात आल्या आहेत. यानुसार, अनपेड ट्विटर अकाऊंटचं ब्लू टिक सबस्क्रिप्शन हटवण्यात येईल. या ट्विटर युजर्सचं अकाऊंट ब्लू टिक पेट सबस्क्रिप्शनचं असेल, फक्त त्याच अकाऊंटच्या ब्लू टिक कायम ठेवण्यात येतील. बाकीच्या अकाऊंटच्या ब्लू टिक हटवण्यात येणार आहे. 1 एप्रिलपासून ट्विटरकडून हे नवीन नियम लागू करण्यात येतील. भारतात ट्विटरच्या ब्लू टिकसाठी 900 रुपये प्रति महिना शुल्क आहे. 

  पेड सबस्क्रिप्शन नसणाऱ्यांचं ब्लू टिक हटवणार

  ट्विटरचे ( Twitter ) मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरवरील ब्लू टिक सब्सक्रिप्शनचा (Twitter Blue Subscription) निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार, आता फक्त पेड सबस्क्रिप्शन विकत घेतलेल्या युजर्सनाचं ट्विटरची ब्लू टिक मिळणार आहे. काही महिन्यांपूर्वी ट्विटरने ब्लू टिक सब्सक्रिप्शनचा नवा पर्याय आणला होता. मात्र, त्याआधी ब्लू टिक मिळालेल्या म्हणजे जुन्या व्हेरिफाईट युजर्सची ब्लू टिक हटवण्यात आली नव्हती. आता कंपनीने आधी दिलेल्या ब्लू टिक हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेड सबस्क्रिप्शन नसलेल्यांना ब्लू टिक मिळणार नाही.

  एलॉन मस्क यांचा ट्विटर युजर्संना दणका

  जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर कंपनी विकत घेतल्यापासून त्यांनी ट्विटरमध्ये अनेक बदल केले आहेत. ट्विटरवरील बनावट अकाऊंट्सना आळा घालण्यासाठी एलॉन मस्क यांच्याकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे तुम्ही अद्याप ट्विटर ब्लू (Twitter Blue) चं सबस्क्रिप्शन घेतलं नसेल 1 एप्रिल नंतर तुमच्या अकाऊंटवर फ्री ब्लू टिक हटवण्यात येईल.

  फेसबूक आणि इंस्टाग्रामवरही ब्ल्यू टीकसाठी मोजावे लागणार पैसे

  दरम्यान, आता ट्विटरप्रमाणे फेसबूक आणि इंस्टाग्रामवर ब्ल्यू टीकसाठीही तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी ही घोषणा केली आहे. याआधी एलन मस्क यांनी ट्विटरवर ब्लू टिक सबस्क्रिप्शन लाँच करून पैसे वसूल करण्यास सुरुवात केली होती. यासाठी सुमारे 900 रुपये मोजावे लागणार आहेत. तूर्तास फेसबूक आणि इंस्टाग्रामवरील प्रीमिअम व्हेरिफिकेशनची सुरुवात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांमध्ये करण्यात येणार आहे. त्यानंतर अन्य देशामध्ये या सेवेची सुरुवात केली जाणार आहे.  Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here