Mark Zuckerberg And Wife Priscilla Chan Welcome Third New Born Daughter Aurelia Chan Shared Instagram

  0
  18


  Mark Zuckerberg Became Father : फेसबुकची (Facebook) मूळ मालकी असलेली कंपनी मेटा (Meta)चे  सीईओ आणि संस्थापक मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. मार्क झुकरबर्ग पुन्हा एकदा बाबा झाले आहेत.  झुकरबर्ग यांची पत्नी प्रिसिलाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. झुकरबर्ग तिसऱ्यांदा पिता बनले आहे. झुकरबर्ग यांनी चिमुकल्या परीचा एक फोटो शेअर केला आहे. त्यांनी आपल्या मुलीचे नाव ऑरेलिया चॅन झुकरबर्ग (Aurelia Chan Zuckerberg) ठेवलं आहे.

  मार्क झुकरबर्ग यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन

  मार्क झुकरबर्ग यांची पत्नी प्रिसिला चॅनने एका गोंडस परीला जन्म दिला आहे. झुकरबर्ग यांनी फेसबुकवर सुंदर पोस्ट शेअर करत ही गोड बातमी दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ऑरिलिया चॅन झुकरबर्ग, जगामध्ये तुझं स्वागत आहे. खरंच तू देवाने दिलेला आशीर्वाद आहेस. मार्क झुकरबर्ग आणि प्रिसिला यांचं हे तिसरं अपत्य आहे.


  मार्क झुकरबर्ग यांनी सप्टेंबर 2022 मध्ये सोशल मीडियावर पत्नी प्रेग्नेंट असल्याची माहिती दिली होती. त्यांनी पोस्ट करत सांगितलं होतं की, तो तिसऱ्यांदा बाप होणार आहे. मेटा सीईओने पत्नी प्रिसिला चॅन हिचा फोटो शेअर करताना ही गोड बातमी दिली होती. मे 2022 मध्ये मार्क झुकेरबर्ग आणि प्रिसिला यांनी लग्नाचा 10 वा वाढदिवस साजरा केला. आपल्या लग्नाच्या दिवसाचा फोटो शेअर करताना झुकेरबर्गने खास शुभेच्छा दिल्या होत्या.

  सोशल मीडिया पोस्ट करत सांगितलं बाळाचं नाव

  मार्क झुकरबर्ग यांनी त्यांच्या नवजात मुलीचं नाव ऑरिलिया असं ठेवलं आहे. ऑरिलिया शब्दाचा अर्थ सोनेरी (Golden) असा आहे. सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी बाळाचं नान ऑरिलिया ठेवल्याचं सांगितलं आहे.

  कॉलेजमध्ये फुललं प्रेम

  मार्क झुकरबर्ग आणि प्रिसिला चॅन यांना आधील दोन मुलं असून मुलीचं नाव मॅक्सिमा (7 वर्ष) आणि मुलाचं नाव ऑगस्ट (5 वर्ष) आहे. मार्क झुकेरबर्ग आणि प्रिसिला कॉलेजपासून एकमेकांना ओळखतात. कॉलेजमध्येच त्यांचं प्रेम खुललं.  2003 मध्ये बीजे हार्वर्ड विद्यापीठात असताना ते एकमेकांना डेट करू लागले. 2012 मध्ये त्यांनी लग्न केलं. 

  महत्त्वाच्या इतर बातम्या :

  Meta Layoffs : ‘मेटा’मध्ये नोकरकपात सुरूच; 10 हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

  Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here