Harvard University The Oldest And Most Prestigious HSSPA Institute Abhishek Suryawanshi From Maharashtra Is The Current President

    0
    20


    Abhishek Suryawanshi on HSSPA : हार्वर्ड विद्यापीठाच्या (Harvard University) सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित HSSPA संस्थेवर अभिषेक सूर्यवंशी (Abhishek Suryawanshi) यांची निवड झाली आहे. हार्वर्ड विद्यापीठाच्या HSSPA (Harvard Student Spouses & Partners Association) संस्थेच्या अध्यक्षपदी अभिषेक सूर्यवंशी यांची निवड झाली आहे. हार्वर्ड स्टुडेंट स्पाऊसेस अँड पार्टनर्स असोसिएशन (Harvard Student Spouses & Partners Association) या संस्थेची स्थापना 1896 मध्ये हार्वर्ड मधील संलग्न परिवार तसेच विद्यार्थ्यांसाठी करण्यात आली.

    HSSPA च्या अध्यक्षपदी अभिषेक सूर्यवंशी यांची निवड

    HSSPA संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अभिषेक सूर्यवंशी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, ‘बराक ओबामा यांच्यासारखे अमेरिकेचे बहुतांश राष्ट्राध्यक्ष तसेच फेसबुक, मायक्रोसॉफ्ट सारख्या आघाडीच्या संस्थेचे मार्क झुकरबर्ग तसेच बिल गेट्स आणि 100 हून अधिक नोबेल पुरस्कार विजेते हार्वर्ड विद्यापीठाशी संबंधित आहेत. अशा प्रतिष्ठित विद्यापीठातील विद्यार्थी तसेच त्यांच्या परिवारासाठी स्थापन केलेल्या 100 वर्षाहून जुन्या ऐतिहासिक संस्थेचे अध्यक्षपद भूषवण्याचे भाग्य मला लाभले याचा मला निश्चितच आनंद आहे. सर्वांच्या मदतीने मी जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडेल हा विश्वास आहे.’

    त्यांनी पुढे सांगितलं की, ‘येत्या काळात हार्वर्डमध्ये जगभरातून येणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी सर्व प्रकारची मदत करणे तसेच त्यांच्यासाठी कल्याणकारी कार्यक्रम राबवणे हे माझ्या कामाचं प्रामुख्याने प्राधान्य असेल.’

    कोण आहेत अभिषेक सूर्यवंशी?

    अभिषेक सूर्यवंशी (Abhishek Suryawanshi) हे विकिपीडियाच्या (Wikipedia) स्वास्थ (Swastha) या उपक्रमाचे संचालक, कम्युनिकेश एक्सपर्ट (Communication Expert) आणि डेटा सायंटिस्ट (Data Scientist) ही आहेत. विकिपीडिया, युनायटेड नेशन्स, बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन आणि TED सारख्या संस्थांसोबत भाषांतराच्या कामाशी जोडले गेले आहेत. अभिषेक सूर्यवंशी 

    विविध भाषांमध्ये माहिती उपलब्ध करून देण्याचं काम 

    सूर्यवंशी यांनी विविध भाषांमध्ये माहिती उपलब्ध करून देण्याचं काम केलं आहे. अडथळे दूर करत सर्वांसाठी ज्ञान सुलभ करण्यासाठी त्यांचं काम सुरु आहे. विशेषत: ग्रामीण भागातील ज्यांना त्यांच्या मूळ भाषेत आरोग्य सेवा माहिती उपलब्ध नसते, अशा लोकांना सूर्यवंशी यांच्या भाषा आणि अनुवादाचा फायदा झाला. 

    HSSPA संस्थेची माहिती

    हार्वर्ड स्टुडंट्स स्पाऊस अँड पार्टनर्स असोसिएशन (HSSPA) ही हार्वर्ड विद्यापिठाची संस्था आहे. ही संस्था 1896 मध्ये सोसायटी ऑफ हार्वर्ड डेम्स म्हणून स्थापन करण्यात आली. हावर्डमधील विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. हावर्डमधील विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत सामाजिक संबंध आणि बौद्धिक समृद्धी वाढवण्याच्या उद्देशाने HSSPA ची स्थापना झाली. HSSPA संख्या 100 वर्ष जुनी आहे.

    महत्त्वाच्या इतर बातम्या :

    Special Report : तुम्ही सांगणार ते मुकाट ऐकणारी पण इंटेलिजन्ट कार; Tesla Auto Driver Car ची सफर



    Source link

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here