Earthquake In Papua New Guinea And Tibet Now Tsunami Warning Issued

  0
  24


  Earthquake in Papua New Guinea: पापुआ न्यू गिनी (Papua New Guinea) आणि तिबेटमध्ये (Tibet) भूकंपाचे धक्के (Earthquake) जाणवले आहेत. तिबेटमधील शिझांग (Sarang) शहरात रविवारी-सोमवारी रात्री भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, दुपारी 1.12 च्या सुमारास शिजांगमध्ये जमिन हादरली. यानंतर लोकांमध्ये भीती पसरली आणि लोक मोठ्या संख्येनं घराबाहेर पडले. सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती समोर आलेली नाही. 

  यापूर्वीही पापुआ न्यू गिनीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.3 मोजली गेली होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, रविवारी रात्री 11.34 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. प्रशासनाकडून त्सुनामीचा इशारा अद्याप देण्यात आलेला नाही. सध्या घटनास्थळी झालेल्या नुकसानीसंदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

  मध्य प्रदेशात रविवारी भूकंपाचे धक्के 

  पापुआ न्यू गिनी आणि तिबेटपर्वी रविवारी सकाळी 11 वाजता मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.6 इतकी नोंदवण्यात आली होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नं दिलेल्या माहितीनुसार, पचमढीपासून 218 किमी अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

  पोर्ट ब्लेअरमध्ये शनिवारी भूकंप 

  1 एप्रिल रोजी अंदमान आणि निकोबार बेटांमधील पोर्ट ब्लेअरमध्ये 4.0 तीव्रतेच्या भूकंपानंतर मध्य प्रदेशात भूकंपाचे धक्के जाणवले होते. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) च्या मते, शुक्रवारी रात्री 11:56 च्या सुमारास पोर्ट ब्लेअरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते.

  भूकंप कसे होतात?

  भूगर्भातील हालचालींमुळे प्रचंड प्रमाणात उर्जेचे उत्सर्जन होते आणि त्याच्या “भूकंप लहरी” तयार होतात. त्यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागाची हालचाल होते. त्यामुळे जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा, कंपन होणे तसेच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप म्हणतात. भूकंपामुळे भूपृष्ठाचा भाग मागे-पुढे किंवा वर-खाली होतो. साहजिकच त्यामुळे भूगर्भात निर्माण होणारे धक्के व लाटा जमिनीच्या आत आणि वरच्या पृष्ठभागावर सर्व दिशांनी पसरतात. जमिनीखाली असलेल्या भूकंपाच्या उगमस्थानास भूकंपनाभी म्हणतात. भूकंपनाभीच्या अगदी वर, भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचा केंद्रबिंदू म्हणतात. तीव्र स्वरूपाच्या लाटा किंवा हादरे सर्वप्रथम या केंद्रालगत येऊन पोहोचतात, त्यामुळे तेथे हानीचे प्रमाण सर्वात जास्त असते. भूकंपाचे हादरे हे सौम्य किंवा तीव्र अशा दोन्ही स्वरूपाचे असू शकतात. पृथ्वीवर होणाऱ्या विध्वंसक भूकंपांपेक्षा सौम्य भूकंपांची संख्या खूपच जास्त असते. भूकंपालेख यंत्रांवर धक्क्यांची नोंद आपोआप होत राहते.  Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here