ISIS Chief Abu Hussain Kureshi Kiied By Trukey Army In Syria Detail Marathi News

  0
  9


  ISIS Chief Dead: संपूर्ण जगभरात दहशतवाद ही खूप मोठी समस्या आहे. प्रत्येक देश दहशतवाद संपण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. परंतु दहशतवादाचे पसरलेले मोठे जाळे पाहता संपूर्ण जगाला एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत मोठं यश आलं आहे. ISIS प्रमुख अबू हुसेन अल-कुरेशी याला इराकी सैन्याने ठार केले आहे. तुर्कस्तानने सीरियाच्या हद्दीत घुसून ही कारवाई केली आहे. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी रविवारी (30 एप्रिल) रोजी ही माहिती दिली. एर्दोगन म्हणाले की, ‘गुप्तचर संस्था दीर्घकाळापासून ISIS प्रमुखाचा पाठलाग करत होत्या’. एर्दोगन यांनी तुर्कीच्या प्रसार माध्यमांना माहिती देताना सांगितले की, ‘अल-कुरेशी तुर्कीच्या राष्ट्रीय गुप्तचर संघटनेने केलेल्या कारवाईत सीरियामध्ये मारला गेला.’

  अबू हुसेन अल-हुसेनी अल-कुरेशी याला अबू हुसेन अल-कुरैशी म्हणून ओळखले जात होते. ISIS चा आधीचा प्रमुख दक्षिण सीरियातील एका कारवाईत मारला गेल्यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये ISIS ने अल-कुरेशीची प्रमुख म्हणून निवड केली. त्यानंतर आता सहा महिन्यांत जगातील सर्वात मोठ्या दहशतवादी संघटनेच्या प्रमुखाचा खात्मा करण्यात आला आहे. 

  सीरियाच्या संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुर्कीच्या सैन्य दलाची ही कारवाई उत्तर सीरियातील जंदारी शहरात झाली आहे. हे शहर सीरियामधील तुर्की समर्थक बंडखोर गटांच्या ताब्यात आहे. 6 फेब्रुवारी रोजी तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भीषण भूकंपात या शहराचे बरेच नुकसान झाले होते. 

  मध्यरात्री केली कामगिरी

  मात्र सीरिया सैन्याने अद्याप या कारवाईबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही. एका स्थानिक रहिवाशाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री ही कारवाई सुरू झाली. यादरम्यान तासभर जोरदार गोळीबार झाला आणि त्यानंतर मोठा स्फोट देखील झाला. तेथे कोणी येऊ नये म्हणून सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला होता.

  ISISची बऱ्याच वर्षांपासून दहशत 

  ISISने 2014 मध्ये आपली दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली. तेव्हा इराक आणि सीरियातील विस्तीर्ण भागांवर त्यांनी कब्जा केला. त्यावेळी त्याचा प्रमुख अबू बकर अल-बगदादी याने संपूर्ण प्रदेशात इस्लामिक खिलाफत घोषित केली होती. त्यानंतर, सीरिया आणि इराकमधील अमेरिकन-समर्थित सैन्याने तसेच इराण, रशिया आणि विविध निमलष्करी दलांसह सीरियन सैन्याने केलेल्या कारवाईमुळे ISISने या प्रदेशावरील आपली पकड गमावली.

  अलिकडच्या काळात ISISचे अनेक दहशतवादी देशाच्या अनेक भागांत बऱ्याच काळापासून लपून राहत आहेत. त्यांचा हा प्रमुख जरी मारला गेला असेल तरी त्यांच्याकडून नवा म्होरक्या लगेच समोर येतो. त्यामुळे त्यांचा फक्त प्रमुखच नाही तर ही दहशतवादी संघटना संपवणे जास्त गरजेचे आहे. त्यासाठी देशातील अनेक गुप्तचर यंत्रणा काम करत आहेत. 

  महत्त्वाच्या इतर बातम्या :

  Four Day Workingweek: 2023 मध्ये कर्मचाऱ्यांना मिळणार मोठं गिफ्ट? आता आठवड्यातून फक्त चार दिवसच काम  Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here