World Laughter Day 2023 Know History And Importance Of The Day Marathi News

  0
  19


  World Laughter Day 2023 : जागतिक हास्य दिन दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. हा दिवस पूर्णपणे हसण्यासाठी समर्पित आहे. या दिवशी देश-विदेशात विविध प्रकारच्या विनोदी स्पर्धांचे आयोजन केले जाते. सर्व लोकांच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी हसणे खूप फायदेशीर आहे.

  जागतिक हास्य दिनाची सुरुवात

  जागतिक हास्य दिन 1998 मध्ये पहिल्यांदा मुंबईत साजरा करण्यात आला जेव्हा हास्य योग चळवळीचे संस्थापक डॉ. मदन कटारिया यांनी त्या चळवळीद्वारे एक सिद्धांत मांडला. हळूहळू उद्याने आणि मैदाने सकाळी हास्याच्या गर्जनेने भरू लागली. अशा प्रकारे लाफ्टर योगाच्या आगमनाने जागतिक हास्य दिनाचा जन्म झाला. 

  हसण्याचे काही फायदे आहेत:

  वेदना कमी होतात : हसण्यामुळे वेदना कमी होतात तसेच शरीरातील एंडोर्फिन सोडल्यामुळे स्नायूंचा ताण कमी होतो.

  अवयव उत्तेजित होतात : लाफ्टर थेरपीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या शरीरात ताजे ऑक्सिजन घेऊ शकता. हे स्नायू, फुफ्फुस आणि हृदय उत्तेजित करते. एंडोर्फिन बाहेर पडतात, तसेच हसल्याने शरीरात रक्ताभिसरण चांगले राहते, ज्यामुळे तुम्ही हृदयविकार टाळू शकता.

  मूड चांगला राहतो : हसण्याने आपला मूडदेखील चांगला राहतो. थोड्या वेळासाठी का होईना पण आपण त्या तणावातून बाहेर येतो. आपलं दु:ख विसरतो. हसणे या मानसिक समस्यांना तोंड देण्यास आणि तुमचा स्वाभिमान सुधारण्यास मदत करते.

  कॅलरीज बर्न होतात : तुम्हाला माहीत आहे का की हसण्याने कॅलरीजही बर्न होतात. जर तुम्ही दिवसातून 10 ते 15 मिनिटे हसलात तर तुम्ही सुमारे 40 कॅलरीज बर्न करू शकता. त्यामुळे जर तुम्हाला कॅलरीज बर्न करून तुमचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल, तर तुम्ही दररोज 15 मिनिटे या ना त्या कारणाने हसण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 

  चांगली झोप येते : रात्री झोप येत नसेल तर त्याचे उपचारही लाफ्टर थेरपीमध्ये दडलेले आहेत. एका अभ्यासानुसार, खूप हसल्याच्या काही सेकंदात सेरेब्रल कॉर्टेक्स इलेक्ट्रिकल इम्पल्स किंवा इलेक्ट्रिकल इम्पल्स सोडते. अशा परिस्थितीत जेव्हाही तुम्हाला रात्री झोप येत नाही, तेव्हा झोपण्यापूर्वी एखादा कॉमेडी सिनेमा किंवा पुस्तक वाचा, यामुळे तुम्हाला चांगली झोप येऊ शकते.

  प्रतिकारशक्ती सुधारते : इतकंच नाही तर हसण्याने शरीराची प्रतिकारशक्ती सुधारते हेही अनेक अभ्यासातून समोर आले आहे. हसण्यामुळे अँटीबॉडीज तयार करणाऱ्या टी पेशींची संख्या वाढते, ज्यामुळे वारंवार आजारी पडण्याची शक्यता कमी होते.

  टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

  Important Days in May 2023 : ‘महाराष्ट्र दिन’, ‘बुद्धपौर्णिमा’सह विविध सणांची मांदियाळी, मे महिन्यातील ‘हे’ आहेत महत्त्वाचे दिवस; वाचा संपूर्ण यादी  Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here