Israel India Relation Foreign Minister Eli Cohen Meets Pm Modi Discusses Strengthening Of Strategic Ties

    0
    15


    India-Israel Bilateral Relations: भारताचा (India) मित्र देश इस्रायलचे (Israel) परराष्ट्र मंत्री एली कोहेन भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी मंगळवारी (09 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी ट्वीट करून भारताला जागतिक महासत्ता असं संबोधलं आहे. 

    इस्रायलचे परराष्ट्र मंत्री एली कोहेन (Foreign Affairs Minister of Israel Eli Cohen) म्हणाले की, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश, जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आणि जागतिक महासत्ता असलेल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची भेट घेतली. दोन्ही देशांमधील धोरणात्मक संबंध मजबूत करणं, अब्राहम कराराचा विस्तार करणं आणि इस्रायलच्या अर्थव्यवस्थेला चालना देणार्‍या मुक्त व्यापार कराराला चालना देण्याबाबत मी पंतप्रधान मोदींशी विस्तृत चर्चा केली. 

    कोहेन पुढे म्हणाले की, इस्रायल आणि भारतातील ज्यू समुदायाप्रती त्यांनी प्रेमळ वागणूक दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानले आणि आम्ही दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यावर सहमती दर्शवली.

    इस्रायलचे परराष्ट्र मंत्री एली कोहेन यांच्या पंतप्रधान मोदी आणि इतर केंद्रीय मंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठका

    इस्रायलचे परराष्ट्र मंत्री एली कोहेन राजकीय-आर्थिक दौऱ्यावर भारतात आले होते. त्यांनी मुख्यत्वे जल व्यवस्थापन आणि कृषी क्षेत्रातील 36 इस्रायली व्यावसायिकांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं. दिल्ली भेटीदरम्यान सचिव कोहेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्याशी द्विपक्षीय बैठका घेतल्या. इस्रायलचे परराष्ट्र मंत्री एली कोहेन यांनी यावेळी सांगितलं की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. 

    Reels

    …म्हणून कोहेन यांनी थांबवला भारत दौरा 

    इस्रायलचे परराष्ट्र मंत्री कोहेन हे तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर होते. मात्र, इस्रायलच्या देशांतर्गत परिस्थितीमुळे त्यांना त्यांचा राजकीय दौरा अचानक थांबवून पुन्हा मायदेशी परतावं लागलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन ते घरी परतले. याबाबत त्यांनी ट्वीट करून माहितीही दिली आहे. 

    कोहेन म्हणाले होते की, आम्ही भारतात पोहोचताच मला सुरक्षा एजन्सींकडून एक सूचना मिळाली जी इस्रायलच्या सुरक्षाविषयक चिंतेकडे निर्देश करत होती. त्यामुळे त्या घटना आणि परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही भारताचा राजकीय दौरा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदींची भेट घेऊन मी इस्रायलला परतणार आहे.

    महत्त्वाच्या इतर बातम्या : 

    IT मंत्री अश्विनी वैष्णव अन् Google CEO सुंदर पिचाई यांची भेट; डिजिटल ट्रांसफॉरमेशनवर चर्चा



    Source link

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here