Monkeypox Is No Longer A Global Health Emergency Declares World Health Organization

    0
    21


    Monkey Pox Updates:  कोरोनानंतर आता आणखी एका आजाराची लाट ओसरली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्स (MonekyPox) आजार आता जागतिक आरोग्य आणीबाणी नसल्याचे जाहीर केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासचिव टेड्रोस ग्रेबेयेसस यांनी त्याबाबतची घोषणा केली आहे. 

    टेड्रोस गेब्रेयसस यांनी एमपॉक्स (मंकीपॉक्स) ही आता जागतिक आरोग्य आणीबाणी नसल्याचे जाहीर केले. बुधवारी, मंकीपॉक्ससाठी आपात्कालीन समितीची बैठक झाली. या बैठकीत मंकीपॉक्सचा आजार आता सार्वजनिक आरोग्य विषयक आणीबाणी नाही. 

    मंकीपॉक्स विषाणू सामान्य आजार आहे, हा फक्त काही प्रकरणांमध्ये गंभीर रूप धरण करू शकतो. मात्र, बहुतेक संक्रमित रुग्ण अल्पावधीत बरे होतात.

    काय आहेत लक्षणे?

    तज्ज्ञांच्या मते ‘मंकीपॉक्स’ हा एक दुर्मिळ विषाणू आहे. ताप आलेल्या व्यक्तीमध्ये जे सामान्य लक्षणे दिसतात, तीच लक्षणे यात दिसून आली आहेत. यामध्ये संक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर पुरळ दिसू लागते. याशिवाय ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा अशी लक्षणे दिसू शकतात.

    कसा वाढतो संक्रमणाचा धोका?

    संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. हा विषाणू त्वचा, श्वसनमार्गातून किंवा डोळे, नाक आणि तोंडातून आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. तसेच, संक्रमित प्राणी देखील या विषाणूचे सक्रिय वाहक असू शकतात. अशा प्राण्याच्या संपर्कात आल्याने, किंवा विषाणू-दूषित वस्तूंद्वारे देखील ‘मंकीपॉक्स’ पसरू शकतो. मुख्यतः आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे किंवा आयात केलेल्या प्राण्यांमुळे हा विषाणू पसरतो.

    जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, मंकीपॉक्स रोगावर सध्या कोणतेही अचूक उपचार नाहीत. या रोगाची लागण झाल्यावर, लक्षणे कमी करण्यासाठी रुग्णावर उपचार केले जातात. मंकीपॉक्स रोखण्यासाठी कांजण्यांवरचे लसीकरण 85 टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.

    इतर महत्त्वाच्या बातम्या: 





    Source link

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here