Pakistan Former Prime Minister Imran Khan Claimed Military Establishment Has Planned To Keep Him In Jail For The Next 10 Years

    0
    11


    Imran Khan Pakistan News: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) प्रमुख इम्रान खान आज (15 मे) लाहोर उच्च न्यायालयात सपत्नीक हजर झाले. त्यांच्याविरुद्ध एका खटल्यात सुनावणी सुरू आहे. लाहोर उच्च न्यायालयाने इम्रान खान यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना अल कादिर ट्रस्ट केसमध्ये दिलासा देताना जामीन मंजूर केला आहे. पाकिस्तानामध्ये इम्रान खान यांना अटक झाल्यानंतर हिंसाचाराचा आगडोंब उसळला होता. यानंतर त्यांच्या पक्षाच्या नेत्यांकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने तातडीने दखल घेत त्यांची सुटका केली होती. 9 मे रोजी झालेल्या हिंसाचार आणि जाळपोळप्रकरणी त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. इम्रान खान यांच्या अटकेच्या विरोधात इम्रान समर्थकांनी कॉर्प्स कमांडरच्या निवासस्थानांवर हल्ला करताना देशाच्या इतर संरक्षण आस्थापनांची तोडफोड केली. त्यानंतर इम्रानच्या समर्थकांची धरपकड सुरू करण्यात आली. 

    सुप्रीम कोर्टाच्या गेटवर आंदोलन, इम्रान यांची टीका 

    दरम्यान, इम्रान खान यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या गेटवर पाकिस्तानी सरकारच्या प्रमुख राजकीय सहयोगी पक्षांच्या पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंटकडून सुरु असलेल्या निदर्शनांवर टीका केली. त्यांनी शांततापूर्ण निषेधाचे आवाहन केले. सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर निदर्शकांची झुंबड उडाल्याचे व्हिडिओ शेअर करताना त्यांनी टिप्पणी केली आहे. आमच्या सुरक्षा एजन्सींकडून या गुंडांना सुप्रीम कोर्टाचा ताबा घेण्यास मदत केली आहे. राज्यघटना मोडीत काढत आहेत, असा हल्लाबोलही त्यांनी केला. 

    इम्रान यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, लंडन संपूर्ण योजना संपली आहे. मी तुरुंगात असताना हिंसाचाराचे कारण वापरून त्यांनी न्यायाधीश, ज्युरी आणि जल्लादची भूमिका स्वीकारली आहे. बुशरा बेगमला तुरुंगात टाकून माझा अपमान करायचा आणि पुढील दहा वर्षे मला कोठडीत ठेवण्यासाठी देशद्रोहाचा कायदा वापरायचा ही योजना आता आहे.

    तर तो पाक स्वप्नाचा अंत असेल

    इम्रान खान यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, कोणताही तपास न करता सरकारी इमारतीवर जाळपोळ, डझनभर निशस्त्र आंदोलकांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे? सुमारे 7000 पीटीआय (इम्रान यांचा पक्ष) कार्यकर्ते, नेते आणि आमच्या महिलांना पाकमधील सर्वात मोठ्या आणि एकमेव संघीय पक्षावर बंदी घालण्याच्या योजनांसह तुरुंगात टाकण्यात आले. या गुंडांना आमच्या सुरक्षा एजन्सी SC ताब्यात घेण्यासाठी आणि राज्यघटना मोडीत काढण्यासाठी मदत करत आहेत. सर्व नागरिकांनी शांततापूर्ण निदर्शने करण्यासाठी तयार राहा. कारण, एकदा का संविधान आणि सर्वोच्च न्यायालय नष्ट झाले की तो पाक स्वप्नाचा अंत असेल.  

    कामगार आणि सत्ताधारी आघाडीच्या समर्थकांसह अनेक आंदोलक न्यायालय परिसरात कलम 144 लागू असताना धरणे धरण्यात सामील होण्यासाठी पोहोचले आहेत. गेल्या आठवड्यात इम्रान खान यांच्या अटकेनंतर सुटका झाल्याने पीडीएमने न्यायव्यवस्थेच्या विरोधात आंदोलन पुकारले आहे. 

    डॉन दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार पीडीएमचे प्रमुख मौलाना फजलुर रहमान आणि पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज) च्या मुख्य संयोजक मरियम नवाझ शरीफ लवकरच या आंदोलनात सामील होतील आणि आंदोलकांना संबोधित करतील. अवामी नॅशनल पार्टी, बलुचिस्तान नॅशनल पार्टी-मेंगल, पाकिस्तान पीपल्स पार्टीसह इतर पक्षांनी या आंदोलनात भाग घेतला आहे. तत्पूर्वी, देशाचे गृहमंत्री राणा सानुआल्लाह यांनी इस्लामाबादच्या रेड झोनमध्ये निदर्शने केल्याबद्दल सुरक्षा एजन्सींच्या ‘अत्यंत चिंताजनक’ अहवालावर चिंता व्यक्त केली, जिथे सरकारी इमारती आहेत. त्यानंतर अर्थमंत्री इशाक दार आणि सनाउल्लाह यांनी फजलुर रहमान यांना निषेधाचे ठिकाण बदलण्यासाठी पटवून देण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी झाला.

    इतर महत्वाच्या बातम्या 



    Source link

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here